-
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे पडसाद पाकिस्तानातही जाणवू लागले आहेत. या हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठी पावले उचलली, ज्यात सिंधू पाणी करार रद्द करणे आणि पाकिस्तानी लोकांना भारत सोडून जाण्याचा आदेशही समाविष्ट आहे. (फोटो: पेक्सेल्स)
-
भारताने उचललेल्या कठोर पावलांचा परिणाम पाकिस्तानी लोकांच्या दैनंदिन जीवनावरही होत आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की संपूर्ण पाकिस्तानमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा तुटवडा आहे. (फोटो: पेक्सेल्स)
-
पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. (फोटो: पेक्सेल्स)
-
पाकिस्तानमध्येही लिंबू खूप महागड्या किमतीत विकले जात आहेत. grocerapp या वेबसाइटनुसार, पाकिस्तानमध्ये २५० ग्रॅम लिंबाची किंमत २३४ पाकिस्तानी रुपये आहे. (फोटो: पेक्सेल्स)
-
पाकिस्तानी लोक खूप जास्त किमतीत तूप खरेदी करत आहेत. सध्या पाकिस्तानात एक किलो तुपाची किंमत २,८९५ पाकिस्तानी रुपये इतकी आहे. (फोटो: फ्रीपिक)
-
पाकिस्तानी सूट म्हणून ओळखला जाणारा महिलांचा पोशाख देखील भारतात खूप लोकप्रिय होता, परंतु पहलगाम हल्ल्यानंतर या सूटच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. (फोटो: पेक्सेल्स)
-
औषधांपासून ते खतांपर्यंत सर्व काही महागलं
भारताने पाकिस्तानबरोबरचा व्यापार थांबवला आहे. ज्याचा सर्वात आधी पाकिस्तानमधील औषधे व खतांच्या किंमतींवर परिणाम झाला आहे. कारण पाकिस्तान यासाठी प्रामुख्याने भारतावर अवलंबून आहे. (फोटो : पेक्सेल्स) -
पाकिस्तानमध्ये फक्त ५०० ग्रॅम मधाची किंमत ५५० ते ७७० पाकिस्तानी रुपयांपर्यंत आहे. (फोटो: पेक्सेल्स)

Maharashtra News Updates : “तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो”, संजय राऊतांची मोदींवर खरमरीत टीका