-
मुंबईतल्या दादरमधील कबुतरखान्यावर आज मोठा आक्रोश पाहायला मिळाला आहे. (एक्स्प्रेस फोटो – आकाश पाटील)
-
१० वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने आंदोलक जमले आणि त्यांनी कबुतरखान्यावरची ताडपत्री काढून टाकली. (एक्स्प्रेस फोटो – आकाश पाटील)
-
यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले आहे. (एक्स्प्रेस फोटो – आकाश पाटील)
-
पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा तथा त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आतमध्ये शिरले. (एक्स्प्रेस फोटो – आकाश पाटील)
-
कबुतरखान्यावरची ताडपत्री, लाकडी बांबू, पोलिसांसमोर आंदोलकांनी तोडण्याता प्रयत्न केला. (एक्स्प्रेस फोटो – आकाश पाटील)
-
एवढंच नाही तर आंदोलकांनी यावेळी तिथे कबुतरांसाठी खाद्यही पसरवलं. (एक्स्प्रेस फोटो – आकाश पाटील)
-
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर पालिकेकडून त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली होती. (एक्स्प्रेस फोटो – आकाश पाटील)
-
मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यानंतर त्यावर जैन समाजाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला होता, यासंदर्भात आंदोलनंही करण्यात आलं होतं. (एक्स्प्रेस फोटो – आकाश पाटील)
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सोमवारी या मुद्दावर बैठक पार पडली होती, यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आज सकाळी दादरमध्ये आंदोलक आक्रमक पवित्रा घेताना दिसून आले आहेत. (एक्स्प्रेस फोटो – आकाश पाटील) हेही पाहा- दादरच्या कबुतरखान्याजवळ राडा, जैन समाज आक्रमक; ताडपत्री काढली, आत घुसले आंदोलक!

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या कानशिलात लगावणाऱ्या आरोपीचं नाव व फोटो समोर, हल्ल्याचं कारणही सांगितलं