-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ५ राज्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. ते मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच पंतप्रधान भारताच्या वाहतूक नकाशावर ईशान्येला स्थान देणाऱ्या ऐतिहासिक रेल्वे मार्ग आणि महामार्गांसह पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. २७ महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर मणिपूर भेट त्यांची पहिली अधिकृत भेट आहे.
-
पंतप्रधान मोदी आज, १३ सप्टेंबर रोजी बैराबी-सैरांग नवीन रेल्वे मार्गाच्या उद्घाटनासाठी ऐझॉल येथे पोहोचले. (Photo: ANI)
-
मिझोरममध्ये त्यांनी ८,०७० कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांना व्हर्च्युअल पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला. राजधानी एक्सप्रेस, सैरंग-कोलकाता एक्सप्रेस आणि सैरंग-गुवाहाटी एक्सप्रेस या तीन महत्त्वाच्या गाड्या ऐझॉलला राजधानी नवी दिल्लीशी जोडणार आहेत. (Photo: PTI)
-
पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी या मार्गाचे उद्घाटन केल्यानंतर, सैरंगहून दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने राजधानीकडे पहिला प्रवास केला. (Photo: PTI)
-
ऐझॉलमधील तरुण विद्यार्थी ऐझॉलहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये चढणारे पहिले प्रवासी ठरले आहेत. (Photo: PTI)
-
मणिपूरमधील चुराचांदपूर येथे विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी यांच्या शेजारी उभे असलेले मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला. (Photo: PTI)
-
मणिपूर हिंसाचाराच्या २ वर्षांनंतर पंतप्रधान मोदी मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनाही भेटले. तिथे पुष्पगुच्छ, हाताने काढलेले चित्र आणि कोकयत नावाची पारंपारिक मणिपुरी टोपी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. (Photo: PTI)
-
सैरंग-दिल्ली राजधानी एक्सप्रेसबरोबप अनेक कलाकारांनी फोटो काढले. यानंतर, पंतप्रधान मोदी गुवाहाटीला पोहोचणार आहेत आणि १२०० कलाकार भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त त्यांना १२ मिनिटांची खास संगीतमय श्रद्धांजली वाहणार आहेत. (Photo: PTI)
-
पीएम मोदींनी आयझॉल बायपास रोड, थेनझॉल-सियालसुक रोड आणि खानकवन-रोंगुरा रोडचेही उद्घाटन केले. (Photo: PTI)
-
पंतप्रधान मोदींनी आज जिरीबाम-इंफाळ रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले आणि या प्रकल्पाची किंमत सुमारे २२,००० कोटी रुपये एवढी आहे. (Photo: X)

“सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…”