-
अनेकजण कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असतात. अनेकांना सुर्यास्त किंवा सूर्योदय पाहायला खूप आवडतं. या पार्श्वभूमीवर आज आपण भारतातील सर्वात सुंदर सूर्योदयाची काही ठिकाणी जाणून घेऊयात. (Photo Source by wikimedia commons)
-
मंदारमणी : पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेलं एक सुंदर समुद्रकिनारी असलेलं गाव आहे. या ठिकाणी समुद्रावरील सूर्योदयाचं दृश्ये, एकांतवास आणि निसर्ग प्रेमींसाठी आदर्श ठिकाण आहे. (Photo Source by wikimedia commons)
-
नंदी हिल्स : बंगळुरूच्या उत्तरेस असलेलं नंदी हिल्स हे एक पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण पहाटेच्या ट्रेकसाठी लोकप्रिय आहे. सूर्योदय पाहण्याच्या अनुभवासाठी हे ठिकाण ओळखलं जातं. (Photo Source by wikimedia commons)
-
पँगाँग सरोवर : लडाखमधील हे एक सुंदर पाण्याच्या सरोवरांपैकी एक आहे. या ठिकाणी दिवसभरात पाण्याचा रंग निळा, हिरवा किंवा कधी गडद निळा असा बदलत राहतो. हे ठिकाण देखील सूर्योदय पाहण्याच्या अनुभवासाठी हे ठिकाण ओळखलं जातं.(Photo Source by wikimedia commons)
-
पुरी बीच : हे ठिकाण ओडिशातील पुरी शहरात असलेल्या बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावरील एक ठिकाण आहे. याला “गोल्डन बीच” असंही म्हणतात. सूर्योदय पाहण्याच्या अनुभवासाठी या ठिकाणी अनेक पर्यटक येतात.(Photo Source by wikimedia commons)
-
ऋषिकेश : हे ठिकाण उत्तराखंडमधील एक हिंदू तीर्थक्षेत्र आहे. ते गंगा नदीच्या किनारी हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं आहे. ऋषिकेशमध्ये अनेक मंदिरे, आश्रम आहेत. तसेच येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांचा संगम होतो. या ठिकाणीही अतिशय छान सूर्योदय अनुभवता येतो. (Photo Source by wikimedia commons)
-
उत्तराखंडमधील चौकोरी : या ठिकाणी कुमाऊँ टेकड्यांमध्ये वसलेलं, चौकोरी येथून हिमालयीन शिखरांचं विहंगम दृश्य दिसतं. पर्वतांना स्पर्श करणारा सकाळचा सूर्य मनाला चैतन्य देणारा असतो.(Photo Source by wikimedia commons)
-
टायगर हिल, पश्चिम बंगाल : टायगर हिल हे दार्जिलिंगमधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. जे नेत्रदीपक सूर्योदयासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणावरून कांचनजंगा आणि माऊंट एव्हरेस्टसह हिमालयाच्या पर्वतरांगांचं विहंगम दृश्य दिसतं..(Photo Source by wikimedia commons)

दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत ‘या’ ४ राशींच्या घरांमध्ये पैशांचा पूर येईल; मंगळ आणि बुध ग्रहाच्या कृपेमुळे होणार कोट्यधीश