-
अलख पांडे हे एडटेक फर्म फिजिक्सवालाचे सहसंस्थापक आणि सीईओ आहेत. सध्या अलख पांडे यांची मोठी चर्चा सुरू आहे.(फोटो स्त्रोत: @PhysicswallahAP/Twitter)
-
अलख पांडे हे एका कोचिंग क्लासचे मालक आहेत. अलख पांडे यांनी आता श्रीमंतांच्या यादीत अभिनेता शाहरुख खानला देखील मागे टाकलं आहे. (फोटो स्त्रोत: @PhysicswallahAP/Twitter)
-
अलख पांडे हे मूळ उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील आहेत. अलख पांडे यांच्या एकूण संपत्तीत आता प्रचंड वाढ झाली असून त्यांना प्रतिष्ठित हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५ मध्ये स्थान मिळालं आहे. (फोटो स्त्रोत: @PhysicswallahAP/Twitter)
-
अलख पांडे हे फिजिक्सवाला क्लासचे सहसंस्थापक असून त्यांनी विद्यार्थ्यांना कमी बजेटमध्ये चांगलं शिक्षण देण्यासाठी २०२० मध्ये क्लासची स्थापना केली होती. (फोटो स्त्रोत: @PhysicswallahAP/Twitter)
-
अलख पांडे फिजिक्स विषय शिकवतात आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. ते सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
अलख पांडे हे मूळ प्रयागराजमधील असून त्यांचं बालपण आर्थिक चणचणीत गेलं. आर्थिक अडचणी असल्यामुळे अलख पांडे यांनी आठवीत असल्यापासून कोचिंग देण्यास सुरुवात केली होती.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
शाहरुख खानपेक्षा श्रीमंत : अलख पांडे यांची संपत्ती १४,५१० कोटी रुपये आहे, तर शाहरुख खानची संपत्ती १२,४९० कोटी रुपये आहे. त्यामुळे अलख पांडे यांनी हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५ मध्ये स्थान मिळवलं आहे.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
अलख पांडेंची फिजिक्सवाला ही कंपनी जेईई,नीट, गेट आणि यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणारे कोर्सेस आणि कौशल्यवृद्धीचे शिक्षण देते.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
तसेच अलख पांडे क्लासच्या माध्यमातून घेत असलेले सर्व कोर्सेस ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स मग त्यामध्ये यूट्युब, वेबसाइट आणि अॅप्सबरोबर ऑफलाइन सेंटर्सवरही चालवले जातात. (फोटो-जनसत्ता)