-
मोदींच्या हस्ते उद्घाटन : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (८ ऑक्टोबर) पार पडलं आहे. मुंबई महानगरातील दुसरं मोठं हे विमानतळ आहे.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
नवी मुंबई परिसरातील आर्थिक विकासाला या विमानतळामुळे गती मिळणार आहे. उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
स्टील आणि काचेपासून तयार केलेलं फ्लोटिंग लोटस हे या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलचं आकर्षण ठरणार आहे.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
विमानतळात प्रगत स्मार्ट विमानतळ तंत्रज्ञानाचा समावेश आहे, जे ५ जी-सक्षम नेटवर्कवर कार्यरत असेल. जे टर्मिनल्स, एअरसाइड ऑपरेशन्स आणि युटिलिटीजमध्ये रिअल-टाइम इंटरनेट ऑफ थिंग्ज देखरेखीला समर्थन देतं. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) पहिल्या टप्प्याचं बांधकाम 19,650 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून करण्यात आलेलं आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पांपैकी एक असलेले हे विमानतळ आहे. नवी मुंबई जागतिक शहरांच्या यादीत स्थान मिळेल.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
सुरक्षित लँडिंग : विमानतळावर कॅटेगरी II इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (ILS) वापरण्यात आलेलं आहे. त्यामुळे वैमानिकांना धुके, मुसळधार पाऊस किंवा इतर हवामान परिस्थितीमुळे धावपट्टीच्या दृश्यमान रेंज (RVR) ३०० मीटरच्या पातळीवर सुरक्षित लँडिंग करता येईल. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
दाट धुकं अथवा पावसाळ्यात ही सिस्टिम उपयोगी पडेल. मुंबई विमानतळावर लॅन्डिंगसाठी ५५० मीटरपर्यंतची दृश्यमानता लागते. त्यामुळे या विमानतळावर अत्याधुनिक लॅन्डिंग सिस्टिम बसवण्यात आलेली आहे.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ १,१६० हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे. पूर्णत्वानंतर हे विमानतळ दरवर्षी ९० दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करेल आणि ३.२५ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळेल, ज्यामुळे हे जगातील महत्वाच्या विमानतळांपैकी एक बनेल..(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
नवी मुंबईचं हे नवं विमानतळ केवळ हवाई वाहतुकीचे नवे केंद्र न ठरता, महाराष्ट्राच्या बांधकाम, गुंतवणूक आणि आर्थिक विकासाच्या क्षेत्रासाठी खऱ्या अर्थाने ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘या’ भाजीचा ज्यूस प्या