-
मागील ३० महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील बहुचर्चित पत्रीपूल कालपासून अखेर वाहतुकीसाठी पुन्हा खुला झाला आणि कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन माध्यमातून पत्रीपुलाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर या पुलावर सेल्फी काढण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. अनेक महिन्यांपासून हा पूल बंद असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. नेहमी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे तर नागरिक पार मेटाकुटीला आले होते. अखेर पत्रीपूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू झाल्याने स्थानिक रहिवासी भलतेच खूश झालेत. पत्रीपुलाचे फोटो काढून सोशल मीडियावरही नेटकरी अनेक मीम्स व्हायरल करत आहेत.
-
करुन दाखवलं…
-
डोनाल्ड ट्रम्प, जो बायडेन, कमला हॅरिस आणि इवांका ट्रम्प पत्रीपुलाची पाहणी करताना…
-
एक पुल की किंमत तुम क्या जानोगे….
-
आता तरी माझ्यावर होणारे जोक्स थांबतील…
-
अखेर आंतरराष्ट्रीय प्रश्न मार्गी लागला….
-
होणार सून मी या घरची सिरियलमधल्या जान्हवीला बाळंत झाल्यावर झाला नसेल तितका आनंद राजकारण्यांना
-
आनंद गगनात मावेना…
-
आज काय आपल्याला भाकर गोड लागणार नाही
-
ऐतिहासिक पत्रीपुल…आता मजुरांचे हात कापणार का….??
-
कल्याण-डोंबिवलीकरांच्या सहनशक्तीला सलाम…
-
२७ गावांच्या सीमेवर असता तर
-
जीटीए गेममध्ये पत्रीपुल….
-
झाला हो झाला…एकदाचा पत्रीपुल सुरू झाला…
-
राम मंदिराआधी पत्रीपुल बांधून झाला…भावना अनावर झाल्यात…
-
चीनने जितक्या आठवड्यात ब्रिज बांधला असता तितक्या वर्षात पत्रीपुल पूर्ण केल्याबद्दल सरकारांचे अभिनंदन…
-
आता पुलाखालून जाणाऱ्या लोकलच बघा…
-
कल्याणकरांसाठी आजचा सुवर्ण क्षण…
-
ट्रॅफिकमधले ते सगळे तास विसरलो….
-
बायडेन आजोबांचंच नाव पत्रीपुलाला द्या…

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल