-
बिहारमधील मुज्जफरापूर येथील एका कलाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाकडी बाहुल्या बनवल्या आहेत. (सर्व फोटो : एएनआयवरुन साभार)
-
जय प्रकाश यांनी बनवलेल्या या बाहुल्या म्हणजे लहान आकाराचे गल्ले आहेत.
-
मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्युची घोषणा केली तेव्हा आपल्याला अशा बहुल्या बनवण्याची कल्पना सुचल्याचं जय प्रकाश यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
-
पंतप्रधान मोदींनी करोनापासून देशाला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याने त्यापासून या बाहुल्या बनवण्याची प्रेरणा आपण घेतल्याचं प्रकाश यांनी म्हटलं आहे.
-
मोदींनी करोनासंदर्भात केलेल्या कामगिरीमुळे त्यांनी देशातील लोकांना वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच मी पैसे वाचवण्यासाठी मोदी थीमवर आधारित हे बाहुली रुपी गल्ले तयार केलेत, असं प्रकाश सांगतात.
-
या गल्ल्यांमध्ये एक लाख रुपयांपर्यंत पैसे गोळा करता येईल. यामध्ये नाण्यांबरोबरच नोटा साठवण्यासाठीही मुबलक जागा आहे, असंही प्रकाश यांनी सांगितलं.
-
हे गल्ले बनवण्यासाठी मला किमान एका महिन्याचा कालावधी लागल्याचं, प्रकाश यांनी सांगितलं.
-
सध्या आपण या गल्ल्यांची मुज्जफरापूरमधील बाजारांमध्ये विक्री करतो असंही प्रकाश म्हणाले.
-
प्रकाश यांच्या सांगण्यानुसार, या बहुल्यांचा वापर लहान मुलांना पंतप्रधान मोदींबद्दल माहिती देण्यासाठी केला जाऊ शकतो.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वोत्तम पंतप्रधान आहेत, असंही प्रकाश यांनी म्हटलं आहे. त्यांनी या गल्ल्यांच्या तळाशी असणाऱ्या बेसवर 'The Best PM In The World', असंही लिहिलं आहे.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS