-
वयाच्या २७ व्या वर्षी विजय शेखर शर्मा १० हजार रुपये प्रती महिना पगारावर काम करायचे. त्यांच्या पगाराचा आकडा पाहून त्यांना लग्नासाठी कोणी होकार देईल का अशी शंका घरच्यांना होती.
-
“२००४-०५ मध्ये मला माझ्या वडिलांनी कंपनी बंद करण्याचा आणि कोणी त्याऐवजी अगदी कोणी ३० हजार रुपये पगारावर नोकरी देत असेल तर ती करण्याचा सल्ला दिला होता,” असं विजय यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.
-
२०१० साली याच विजय शेखर शर्मा यांनी पेटीएमची स्थापना केली.
-
नुकतच या कंपनीचं शेअर मार्केटमध्ये लिस्टींग झालं आहे. या कंपनीच्या आयपीओने अडीच अरब डॉलर्सचं भांडवल उभं केलं आहे.
-
“२००४-०५ मध्ये मला माझ्या वडिलांनी कंपनी बंद करण्याचा आणि कोणी त्याऐवजी अगदी कोणी ३० हजार रुपये पगारावर नोकरी देत असेल तर ती करण्याचा सल्ला दिला होता,” असं विजय यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.
-
महिना १० हजार पगार ते फोर्ब्सने दखल घ्यावी इतकं श्रीमंत होण्याचा विजय यांचा हा प्रवास फारच खडतर होता, त्यावर टाकूयात नजर…
-
विजय शेखर शर्मा हे इंजिनियर आहेत. २००४ साली ते स्वत:च्या एका छोट्या कंपनीच्या माध्यमातून मोबाईलवरील कंटेंट बनवून विकण्याचं काम करायचे.
-
त्याच काळात विजय यांच्या लग्नासाठी घरचे स्थळं बघत होते. मात्र विजय यांच्या पगाराबद्दल कळताच मुलीकडचे नकार द्यायचे. यासंदर्भात विजय यांनीच माहिती दिलीय.
-
“मी महिन्याला दहा हजार रुपये कमवतो हे मुलीकडच्यांना समजायचं तेव्हा ते समोरुन कधीच लग्नाचा विषय पुढे न्यायचे नाहीत. मी माझ्या कुटुंबातील अयोग्य (लग्न न होणारा) मुलगा झालो होतो,” असं विजय सांगतात.
-
आज विजय यांची एकूण संपत्ती १७ हजार कोटी रुपये इतकी आहे.
-
मागील आठवड्यामध्ये ४३ वर्षीय शर्मा यांच्या पेटीएम कंपनीने इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओच्या माध्यमातून २.५ अब्ज डॉलर म्हणजेच एक खर्व ३२ अब्ज रुपयाचं भांडवल उभं केलं.
-
सध्या पेटीएम ही देशातील आघाडीच्या आयटी क्षेत्रांमधील कंपन्यांच्या तुलनेची कंपनी झाली असून अनेकजण आता विजय यांच्याकडे आणि पेटीएमच्या प्रवासाकडे प्रेरणा म्हणून पाहतात.
-
विजय शेखर शर्मा यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील अलीगढ येथे झाला.
-
विजय यांचे वडील एका शाळेमध्ये शिक्षक होते, आता ते निवृत्त झाले आहेत. विजय यांची आई गृहिणी आहे.
-
सुरुवातीचे काही वर्ष विजय यांनी अलीगढमधील हरदआगंजमधील एका हिंदी शाळेमधून शिक्षण घेतलं.
-
त्यानंतर विजय यांनी दिल्लीमधील कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमधून बॅचलर ऑफ इंजीनियरिंगमध्ये पदवी संपादन केली.
-
अलगीढमधील एका छोट्याश्या गावातून सुरु झालेले विजय यांचा प्रवास आज फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीपर्यंत पोहचलाय.
-
विजय यांनी १९९७ साली इंजीनियरींगचे शिक्षण घेत असतानाच इंडिया साईट डॉट नेट नावाची एक वेबसाईठ तयार केली होती. त्यानंतर त्यांनी हे वेबसाईट लाखो रुपयांना विकली होती.
-
त्यानंतर विजय यांनी २००० साली वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेड नावाच्या कंपनीची स्थापना केली.
-
या कंपनीच्या माध्यमातून क्रिकेट सामन्यांचे स्कोअरकार्ड, जोक, रिंगट टोन्स आणि परिक्षांचे निकाल यासारख्या गोष्टी मोबाईलवर पुरवल्या जायच्या.
-
आज विजय यांनी २१ वर्षांपूर्वी स्थापन केलेली हीच वन ९७ कम्युनिकेश लिमिटेड पेटीएमची पॅरेंट कंपनी आहे.
-
२०१७ साली विजय हे भारतातील सर्वात कमी वयाचे अब्जाधीश ठरले होते.
-
अनेक वर्ष माझ्या आई-वडिलांना ठाऊक नव्हतं की मी नक्की काय काम करतोय, असं विजय सांगतात.
-
“एकदा माझ्या आईने एका हिंदी वृत्तवाहिनीवर माझ्या संपत्तीबद्दल ऐकलं तर मला विचारलं होतं खरोखर तुझ्याकडे एवढे पैसे आहेत का?, असं विचारलं होतं,” अशी आठवण विजय यांनी सांगितली आहे.
-
पेटीएमची सुरुवात एक दशकापूर्वी झालेली. ही कंपनी पूर्वी मोबाईल रिचार्ज करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन द्यायची.
-
मात्र नंतर उबरने या कंपनीला आपलं पेमेंट पार्टनर बनवलं तेव्हापासून कंपनीचं आणि विजय यांचं नशीब पालटलं.
-
त्यानंतर २०१६ साली नोटबंदीच्या निर्णयामुळे पेटीएमला अच्छे दिन आले आणि त्याच्या जोरावरच कंपनीने फिनिक्स भरारी घेतली. (सर्व फोटो रॉयटर्स, पीटीआय आणि सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर