-
भाजपाचे नेते आणि महाराष्ट्रातील माजी कॅबिनेट मंत्र्यांची सुकन्या लवकरच ठाकरे कुटुंबाची सून होणार आहे.
-
हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा विवाह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाशी होणार आहे.
-
बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरेंसोबत अंकिता विवाहबंधनामध्ये अडकणार आहेत.
-
मुंबईमधील एका आलिशान हॉटेलमध्ये २८ डिसेंबर रोजी अंकिता आणि निहार यांचा विवाह पार पडणार आहे.
-
अगदी मोजक्या उपस्थितांच्या साक्षीने निहार आणि अंकिता यांचा हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
-
अंकिता पाटील कोण आहेत? > अंकिता पाटील या सध्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत.
-
अंकिता यांचे वडील भाजपामध्ये असले तरी त्या काँग्रेसच्या सदस्या म्हणून जिल्हा परिषदेत काम पाहतात.
-
अंकिता या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या निर्देशक पदावर कार्यरत आहेत.
-
अंकिता यांचे वडील हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणामधील महत्वाच्या नेत्यांपैकी एक नाव आहे.
-
हर्षवर्धन यांनी २०१९ साली निवडणुकांच्या आधीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
-
निहार ठाकरे कोण> निहार यांची अगदी थोड्यात ओळख सांगायची झाल्यास ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत.
-
बाळासाहेबांचे दिवंगत पुत्र बिंदूमाधव ठाकरे हे निहार यांचे वडील.
-
निहार यांचे वडील म्हणजेच बिंदूमाधव यांचं १९९६ साली एका अपघातामध्ये निधन झालं.
-
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे असणारे निहार हे मुंबईमधील एक प्रतिष्ठित वकील आहेत.
-
निहार यांचे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंशी चांगले संबंध आहेत.
-
अनेकदा निहार अमित यांच्यासोबतचे फोटो फेसबुकवरुन शेअर करत असतात.
-
मनसेच्या प्रचाराच्या वेळीही निहार ठाकरे राज यांच्या कुटुंबियांसोबत प्रचार सभांमध्ये सहभागी झाले होते.
-
अमित ठाकरेंसोबतचे निहार यांचे अनेक फोटो सोशल नेटवर्किंगवर आहेत.
-
निहार यांनी शेअर केलेला राज यांच्यासोबतचा फोटो
-
अंकिता पाटील यांनी लंडनमधील हार्वर्ड विद्यापिठामध्ये एका वर्षाच्या एका विशेष कोर्सचं शिक्षण घेतलं आहे.
-
तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही अंकिता यांनी शिक्षण घेतलं आहे.
-
तर निहार ठाकरे यांनीही हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलं असून एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे.
-
हे शिक्षण घेत असतानाच अंकिता आणि निहार यांची ओळख झाल्याचं सांगितलं जातं.
-
अंकिता या सोशल नेटवर्किंगवर फार सक्रीय आहेत.
-
अनेकदा अंकिता सोशल नेटवर्किंगवर आपल्या जवळच्या व्यक्तींबद्दलचे फोटो पोस्ट करत असतात.
-
सोशल नेटवर्किंगवर खास करुन इन्स्टाग्राम अकिंता यांना हजारोंच्या संख्येने फॉलोअर्स आहेत.
-
कधी चुलीवर जेवण बनवातचे फोटो अंकिता पोस्ट करतात.
-
तर कधी कार्यालयामध्ये कामामध्ये व्यस्त असतानाचे फोटो अंकिता पोस्ट करतात.
-
अंकिता यांनी एकदा सलमानबरोबरचा फोटोही शेअर केला होता.
-
अंकिता आणि निहार यांच्या लग्नाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रामधील राजकीय क्षेत्रातील दोन मोठी कुटुंब कायमची नात्यात बांधली जाणार आहेत.
-
मंगळवारी हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खासगी भेट घेऊन त्यांना या लग्नाचं विशेष आमंत्रण दिलं आहे. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवरुन साभार)
पुण्यातील कुंडमळ्यात पूल कोसळला; २० ते २५ जण बुडाल्याची शक्यता
