-
पंतप्रधान नरंद्र मोदींनी आज त्यांच्या घरी रक्षाबंधनाचा दिवस काही विशेष पाहुण्यांसोबत साजरा केला.
-
सकाळीच पंतप्रधानांनी ट्विटरवरुन देशातील नागरिकांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. “सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा” असं ट्विट मोदींनी केलं होतं.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलींनी आज पंतप्रधान मोदींना राख्या बांधल्या. दुपारी एकच्या सुमारास हा आगळावेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला.
-
पंतप्रधान मोदींच्या कार्यालयामध्ये सफसफाईचं काम करणारे कर्मचारी, माळी, शिपाई, वाहनचालक यांच्याबरोबरच इतर कर्मचाऱ्यांच्या मुलींनी आज मोदींना राख्या बांधल्या.
-
या आगळ्या वेगळ्या रक्षाबंधन सेलिब्रेशनचे व्हिडीओ अधिकाऱ्यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहेत. मोदींनी या मुलींसोबत छान गप्पाही मारल्या.
-
पंतप्रधान मोदींनीही, “य़ा तरुण मंडळींसोबत फार खास रक्षाबंधन साजरं केलं,” असं म्हणत काही फोटो शेअर केले आहेत.

Russian Woman : घनदाट जंगलातील गुहेत आढळून आली रशियन महिला, दोन मुलींसह करत होती वास्तव्य; सांगितलं ‘हे’ कारण