-
महानायक अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता सगळ्यांनाच ठाऊक आहे. देशभरात त्यांचे जितके चाहते आहेत तितकेच चाहते जगभरातही आहेत.(फोटो: संग्रहित फोटो)
-
त्यांची एक झलक बघण्यासाठी अजूनही त्यांच्या मुंबईच्या घराबाहेर प्रचंड गर्दी होते. पण प्रत्येक चाहत्याला त्यांची झलक मिळेलच असं नाही.(फोटो: संग्रहित फोटो)
-
असाच एक बच्चनजी यांचा बाहेरच्या देशातील चाहता सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्यांनी जे केलं आहे ते ऐकलं तर आपल्या सगळ्यांचे डोळे पांढरे पडतील हे नक्की.(फोटो: संग्रहित फोटो)
-
न्यू जर्सीमधील एडिसन शहरात राहणाऱ्या एका भारतीय अमेरिकी कुटुंबाने अमिताभ बच्चन यांच्या एका भव्य मूर्तीचे अनावरण केले आहे.(फोटो: ट्विटर)
-
हे करताना त्यांनी त्यांच्याच घरी एक भव्य सोहळादेखील आयोजित केला होता.(फोटो: ट्विटर )
-
इथे स्थायिक असणाऱ्या रिंकू आणि गोपी सेठ या दांपत्याने त्यांच्या घराबाहेर अमिताभ बच्चन यांची एक भव्य प्रतिमा ठेवली आहे.(फोटो: ट्विटर)
-
या कार्यक्रमात तब्बल ६०० लोकं हजर होते. एका मोठ्या काचेच्या बॉक्समध्ये बच्चन यांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते.(फोटो: ट्विटर)
-
अमिताभ त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या अवतारात बसलेले आपल्याला दिसतात. ही मूर्ती राजस्थानमध्ये तयार केली गेली आहे. या मूर्तीची किंमत ७५००० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच तब्बल ६० लाख रुपये इतकी आहे.(फोटो: ट्विटर)
-
यावर गोपी यांनी सांगितलं की, “बच्चन साहेब हे आमच्यासाठी देवासारखेच आहेत. ते खूप साधे आहेत, आणि त्यांचे त्यांच्या चाहत्यांशी ऋणानुबंध अगदी घट्ट आहेत. इतर स्टार्स आणि बच्चन साहेब यांच्यात खूप मोठा फरक आहे, आणि म्हणूनच त्यांची ही प्रतिमा घराबाहेर ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.”(फोटो: ट्विटर)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या