-
महाराष्ट्रात इतके विलक्षण लोक जन्माला आले. पण आपण त्या सर्वांना जातीमध्ये अडकलं आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
-
मराठी चित्रपट ‘हर हर महादेव’च्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या चित्रपटासाठी राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे.
-
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या आठवणी, विचार मोकळेपणाने मांडले.
-
तसंच राज्यातील सध्याच्या सामाजिक स्थितीवर भाष्य करत नाराजी जाहीर केली.
-
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची ओळखच आहे.
-
महात्मा ज्योतीराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत ज्ञानेश्ववर महाराज यांच्यासह इतके संत, साहित्यिक, क्रांतीकारक आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले आणि ही माती विचारांनी सुपिक केली.
-
पण आपण त्यांना जातीमध्ये बांधत आहोत. हे मराठ्यांचे, हे दलितांचे, हे माळ्याचे… इतका घाणेरडा विचार असलेला महाराष्ट्र मी याआधी कधी पाहिलेला नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
-
राज ठाकरे पुढे म्हणाले, “ही सर्वांची माणसं असून आपण त्यांना सर्वदूर पोहोचवली पाहिजेत.
-
आमच्याकडे किती विलक्षण माणसं होऊन गेली हे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे.
-
पण त्याऐवजी आपण हे आमचे असून यांचं नाव तुम्ही घ्यायचं नाही, लिहायचं नाही असं सांगत असतो.काहींना यातून आनंद मिळतो, तर काहींना राजकीय फायदे मिळतात, असंही राज ठाकरे म्हणाले.
-
इतकी मोठी माणसं आपल्याकडे जन्माला आल्यानंतर त्यांचे गुणगान गाण्याऐवजी जातीत कसले बांधत आहोत?
-
छत्रपतींनी तर १८ पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली होती.
-
त्यांना आपण जातीत बांधत आहोत. लोकमान्य टिळकांना आपण ब्राह्मण म्हणत आहोत.
-
हा महाराष्ट्र आपण कुठे नेऊन ठेवला आहे?
-
पूर्वी दूरदर्शनला ‘आपली माती, आपली माणसं’ कार्यक्रम यायचा, त्याचं नाव बदलून आता ‘आमच्या माणसांनी केलेली आमची माती’ असं केलं पाहिजे,” असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. (सर्व संग्रहित फोटो- लोकसत्ता)
रोहित शर्मा, कोहली पहिल्याच सामन्यात अपयशी ठरल्यानंतर सुनील गावस्कर यांचं मोठं विधान; म्हणाले, “तर आश्चर्य वाटणार नाही…”