-
सोमवारी सायंकाळी पुण्यात तुफान पाऊस झाला. या पावसात अनेक दुचाकी वाहून गेल्या तर चारचाकी गाड्या अडकून पडल्या. (सर्व फोटो : अरुल होरायझन/ इंडियन एक्सप्रेस)
-
कोंडाव्यातील एनआयएमबी अॅनेक्स परिसरामध्ये अशीच एक आलिशान गाडी पावसाच्या पाण्यात अडकली.
-
पावसामुळे साचलेल्या पाण्यात अडकलेली ही गाडी बीएमडब्ल्यू कंपनीची होती.
-
बीएमडब्लू फाइव्ह सिरीजच्या या गाडीला पाण्यातून बाहेर काढण्याआधीच ती अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडाली होती.
-
अखेर या गाडीच्या चालकाने रेस करुन गाडी पाण्यातून काढण्याऐवजी इतरांची मदत घेण्याचा निर्णय घेतला.
-
व्हीबग्योअर शाळेजवळच्या खोलगट भागातील रस्त्यावर अडकलेली ही गाडी बाहेर काढण्यासाठी काही रिक्षावाले आणि इतर चारचाकी मालक समोर आले.
-
पाण्यामध्ये बुडालेली ही आलिशान गाडी दोरखंडाच्या मदतीने बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
-
काही अंतरावर उभ्या असणाऱ्या गाडीच्या पुढील भागाला दोरखंडाचं एक टोक बांधण्यात आलं.
-
दुसरं टोक या बुडालेल्या बीएमडब्ल्यूला बांधण्यात आलं आणि ती बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु झाला.
-
बारच वेळ हा प्रयत्न सुरु होता.
-
एक दोन वेळा दोर व्यवस्थित जागेवर आणून पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यानंतर ही गाडी किमान चालू शकेल अशा पाणी पातळीजवळ आली आणि मग बाहेर निघाली.
-
बीएमडब्लू फाइव्ह सिरीजच्या या महागड्या गाड्यांची किंमत भारतामध्ये किमान ६५ लाखांपासून सुरु होते. (सर्व फोटो : अरुल होरायझन/ इंडियन एक्सप्रेस)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक