-
Indian Shoes Brands : अनेक स्वदेशी फुटवेअरमध्ये अनेक ब्रँड आहेत ज्यांनी पुमा, नायके, आदिदास आणि रिबॉक इत्यादी आंतरराष्ट्रीय ब्रँडशी स्पर्धा केली आहे.
-
छोट्या स्तरावर सुरू झालेले हे ब्रँड्स देश-विदेशात चांगलेच चालले.
-
बाजारपेठेत आपला ठसा उमटवण्यासोबतच या कंपन्या कोट्यवधी रुपयांची कमाईही करत आहेत. (Photo: Pixabay)
-
आज आम्ही तुम्हाला अशा मेड इन इंडिया ब्रँड आणि त्यांच्या मालकांबद्दल सांगत आहोत, जे आज देश-विदेशात झेंडा फडकवत आहेत. (Photo: Pixabay)
-
त्यांच्या कमाईबद्दल वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. (Photo: Pixabay)
-
१९९५ मध्ये रेड चीफचे मालक मनोज ग्यानचंदानी यांनी युरोपमध्ये लेदर फुटवेअर निर्यात करण्यासाठी लियान ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड सुरू केली. १९९७ मध्ये,त्यांनी लियान ग्लोबल अंतर्गत रेड चीफ ब्रँड लॉन्च केला. (Photo: redchief.in)
-
२०११ मध्ये या शू ट्रेडरने कानपूरमध्ये पहिले खास रेड चीफ आउटलेट सुरू केले. आज रेड चीफची यूपीसह १६ राज्यांमध्ये १७५ स्टोअर्स आहेत. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजमध्ये केलेल्या फायलिंगनुसार, २०२१ मध्ये कंपनी वार्षिक ३२४ कोटींपेक्षा जास्त बिझनेस करते. (Photo: redchief.in)
-
वुडलँडची स्थापना क्यूबेक कॅनडात झाली. पण तिचा पाया भारतातून आहे. मूळचे भारतातील अवतार सिंग यांनी १९८० मध्ये वुडलँडची मूळ कंपनी एरो ग्रुपची स्थापना केली. वुडलँडचे प्रमुख उत्पादन केंद्र नोएडामध्येच आहे. (Photo: Twitter?
-
वुडलँडचे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ८ कारखाने आहेत, जे ७० टक्के मागणी पूर्ण करतात. वुडलँड दरवर्षी १,२५० कोटी रुपयांचा बिझनेस करते.
-
लाखनीची सुरुवात १९६५६ मध्ये परमेश्वर दयाल लखानी यांनी केली होती. (Photo: Lakhanifootwear.com)
-
लखानी कुटुंबातील दुसऱ्या पिढीतील उद्योजक मयंक लखानी यांनी हा प्रवास पुढे नेला आणि त्याला चांगली ओळख दिली. (Photo: Lakhanifootwear.com)
-
कंपनी दरवर्षी १५० ते २०० कोटींची उलाढाल करते. (Photo: Twitter)
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…