-
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. आपल्या धुवांधार बॅंटिगने क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य करणारा विराटही आता अलिबागकर झाला आहे.
-
विराटने सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर अलिबागमध्ये आठ एकर जागेचा प्लॉट खरेदी केला.
-
सेलिब्रिटींप्रमाणे अलिबागची भूरळ विराटलाही पडली. अलिबागकर होण्याचा मोह त्याला आवरता आला नाही, असंच म्हणावं लागेल.
-
परंतु, अलिबागमधील झिराड येथे प्लॉट खरेदी केला तेव्हा सप्टेंबर महिन्यात विराट आशिया कप क्रिकेटसाठी दुबईत होता.
-
मग दुबईमध्ये असताना विराट अलिबागकर कसा काय झाला? नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया.
-
खरं तर प्लॉट खरेदी करण्याच्या आधीच सहा महिन्यांपूर्वी विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी झिराड येथे येऊन जागेची पाहणी केली होती.
-
परंतु, क्रिकेटच्या मॅचमध्ये व्यग्र असल्यामुळे कोहलीला अलिबागमध्ये येऊन जागेचा व्यवहार पूर्ण करता येत नव्हता.
-
त्यामुळे गणपतीच्या आदल्या दिवसाचा मुहूर्त साधत कोहलीचा लहान भाऊ विकास कोहली याने ‘पॉवर ऑफ अटर्नी’द्वारे विराट कोहलीसाठी व्यवहार पूर्ण केला.
-
कोहलीने अलिबागमध्ये खरेदी केलेल्या जमिनीची एकूण किंमत १९ कोटी २४ लाख ५० हजार रुपये इतकी आहे.
-
यासाठी कोहलीला ३ लाख ३५ हजार रेडीरेकनरनुसार १ कोटी १५ लाख ४५ हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागली होती.
-
अलिबागसारख्या निसर्गरम्य परिसरात जागा खरेदी करण्याचा मोह सेलिब्रिंटीप्रमाणे आता क्रिकेटरलाही होत आहे.
-
कोहलीआधी रोहित शर्मानेही अलिबाग जागा खरेदी केली होती.
-
तर रवी शास्त्री यांनी दहा वर्षांपूर्वीच अलिबागमध्ये घर बांधलं आहे.
-
(सर्व फोटो : विराट कोहली/ इन्स्टाग्राम)

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”