-
नागझिरा अभयारण्यातून आलेल्या ‘जय’ वाघाने अवघ्या एक वर्षात उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचे नाव वन्यजीव पर्यटनाच्या जागतिक नकाशावर पोहोचवले.
-
याच अभयारण्यात तेव्हा इतरही वाघ होते, पण ‘त्या’ वाघांना आपली ओळख निर्माण करता आली नाही.
-
‘जय’ची सहचारिणी असलेल्या ‘चांदी’ वाघिणीने ‘जय’प्रमाणे दरारा निर्माण केला नसला, तरी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित केले.
-
‘जय’चा रुबाब एवढा होता की इतर वाघीण त्याच्याजवळ सहसा जात नसत, पण चेहऱ्यावर प्रचंड तेज असणाऱ्या ‘चांदी’ वाघिणीने ‘जय’ला भूरळ घातली.
-
तो बरेचदा एकटा फिरत असला, तरी या दोघांची जोडी पर्यटकांना अनेकदा एकत्रसुद्धा दिसली.
-
चकाकणारी त्वचा, रुबाबदार चाल यामुळे हळूहळू ती पर्यटकांच्या पसंतीस उतरु लागली.
-
जयचंद, भद्रा आणि बली या तीन बछड्यांना ‘चांदी’ने जन्म दिला आणि ‘जय’ हा त्यांचा पिता होता.
-
मात्र, ‘जय’ अचानक बेपत्ता झाला आणि ‘चांदी’ची रुबाबदार चाल, चमकणारी त्वचा हे सारे काही फिके पडू लागले.
-
काही दिवसानंतर तिनेही हे अभयारण्य सोडले. वयाची दशकपूर्ती झालेली ‘चांदी’ आता पर्यटन नसलेल्या ब्रम्हपूरी वनक्षेत्रात असल्याचे बोलले जाते. (फोटो: प्रफुल्ल सावरकर)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल