-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅमझॉन कंपनीचे फाऊंडर जेफ बेझोस यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी आपली प्रेमिका लॉरेन सांचेजशी साखरपुडा केला आहे.
-
जेफ यांनी २०२९ साली लॉरेनसह आपले नाते सार्वजनिक केले होते. ते २०१८ पासून एकत्र आहेत. जवळपास ५ वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी साखरपुडा केला असल्याच्या बातम्या येत आहेत.
-
मात्र, जेफ बेझोस यांची प्रेमिका लॉरेन कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण लॉरेन सांचेजबद्दल माहिती जाणून घेऊया.
-
जेफ बेझोस यांची प्रेमिका लॉरेन सांचेज त्यांच्या इतकीच प्रसिद्ध आहे. ५३ वर्षीय लॉरेन ब्रॉडकास्ट जर्नलिस्ट म्हणून कार्यरत होती. याशिवाय तिने काही चित्रपटांमध्ये कामही केले आहे.
-
लॉरेनने ‘द लॉन्गेस्ट यार्ड’, ‘द डे ऑफ्टर टुमॉरो’, ‘फाइट क्लब’ आणि ‘टेड 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
इतकेच नाही तर काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती एक हेलिकॉप्टर पायलट असण्याबरोबरच ‘ब्लॅक ऑप्स एविएशन’ची फाऊंडर आहे.
-
जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेज दोघेही घटस्फोटित आहेत. जेफ यांनी २०१९ मध्ये आपली पहिली पत्नी मॅकेन्झी बेझोसला घटस्फोट दिला होता. त्यांनी २५ वर्ष संसार केला होता, तर त्यांना ४ मुलेही आहे.
-
दुसरीकडे, लॉरेन सांचेजचे लग्न हॉलिवूडचे प्रसिद्ध एजंट पॅट्रिक व्हाइटलेसबरोबर झाले होते. १३ वर्षाच्या संसारात त्यांना २ मुले झाली.
-
जेफ आणि लॉरेनला त्यांच्या घटस्फोटानंतर अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. नुकतंच दोघांनी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रँड एंट्री केली. यानंतर ते आणखीनच चर्चेत आले.
-
लॉरेन सांचेझने नोव्हेंबर २०२२ मध्ये सांगितले की बेझोसच्या पावलावर पाऊल ठेवून अंतराळात जाण्याची तिची योजना आहे.
-
सध्या लॉरेन ‘बेझोस अर्थ फंड’ची उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. लॉरेन सांचेझची एकूण संपत्ती $35 दशलक्ष म्हणजेच जवळपास २८९ कोटी आहे.
-
Photos: lauren-sanchez/Instagram

“…तर परिणाम भोगावे लागतील”, भारताचा पाकिस्तानला इशारा; जयशंकर म्हणाले, “सर्वात कुख्यात दहशतवादी पाकिस्तानातच”