-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणातून “मी पुन्हा येईन” असं म्हटलं होतं.
-
त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीनंतर मी स्व: पंतप्रधान असेल, असा दावा नरेंद्र मोदींनी केला.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोलेबाजी केली आहे.
-
यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना एक सल्लाही दिला. ते बीड येथील स्वाभिमान सभेत बोलत होते.
-
शरद पवार भाषणात म्हणाले की, स्वातंत्र्यदिनी दिल्लीत केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी पुन्हा येईन”
-
माझी पंतप्रधानांना एकच विनंती आहे. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते, त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस. त्यांनीही सांगितलं होतं, मी पुन्हा येईन- शरद पवार
-
त्यामुळे तुम्ही जी घोषणा केली. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं का? -शरद पवार
-
फडणवीसांनी सांगितलं होतं. मी पुन्हा येईन. ते पुन्हा आले. पण ते मुख्यमंत्री म्हणून नाही आले, तर खालच्या रँकवर आले. -शरद पवार
-
आता तुम्ही (नरेंद्र मोदी) म्हणतायत की मी पुन्हा येईन. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन यायचं असेल तर आज ज्या पदावर आहात, त्या पदाच्या खाली कुठे जायचंय, याचा विचार करून पुढचं पाऊल टाका. एवढंच याठिकाणी सांगतो, असा खोचक सल्ला शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना दिला. (सर्व फोटो सौजन्य-लोकसत्ता)

भारतातील आयफोन निर्मितीला फटका, फॉक्सकॉनमध्ये काम करणारे चीनी कर्मचारी परत का जात आहेत?