-
“शार्क टँक इंडिया” त्याच्या नवीन पर्वासह परत येत आहे. यावेळी या बिझनेस रिअॅलिटी शोमध्ये अनेक नवीन परीक्षक दिसणार आहेत. OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यावेळी परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ३० वर्षांचा रितेश हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील उदयोन्मुख व्यावसायिकांपैकी एक आहे.
-
रितेशने वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी OYO Rooms या कंपनीची स्थापना केली. पण तुम्हाला माहित आहे का की १६,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालकाचं घर चालविण्यासाठी शिक्षण सुटले.
-
रितेशचा जन्म ओडिशातील बिसम कटक येथील मारवाडी कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब ओडिशातील रायगडा येथे एक छोटेसे दुकान चालवत होते. आपल्या मुलाने अभियंता व्हावे अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती, म्हणून त्यांनी दहावी आणि बारावी पूर्ण केल्यानंतर रितेशला दिल्लीला पाठवले.
-
२०११ मध्ये रितेश उच्च शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला आला. पुढील शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला, पण शिक्षण पूर्ण केले नाही. किंबहुना, अभ्यासासोबतच रितेशने आपला खर्च भागवण्यासाठी मोबाईल सिम विकायलाही सुरुवात केली.
-
रितेशला जेव्हा सिम विकून पैसे कमवण्याची आवड निर्माण झाली तेव्हा त्याला व्यवसाय सुरू करण्याचे वेड लागले. हॉटेलमधील रूम्स बुक करण्यात लोकांचा वेळ वाया जाण्याची शक्यता ऑनलाइन बुकिंगद्वारे वाचवता येईल, असा एक विचार त्यांच्या मनात आला.
-
त्यानंतर रितेशने ग्राहकांच्या समस्या समजून घेतल्या आणि एक अॅप तयार केले ज्याद्वारे हॉटेल्स ऑनलाइन बुक केले जात होते. २०१३ मध्ये, त्याने ओरेव्हल स्टेज नावाची ऑनलाइन रूम बुकिंग कंपनी उघडली.
-
त्याची कल्पना कामी आली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. नंतर, कंपनीच्या नावाची जाहिरात करण्यात अडचण आल्याने रितेशने त्याचे नाव बदलून OYO Rooms केले. सध्या, OYO रूम्स ८० देशांमधील ८०० हून अधिक शहरांमध्ये आहेत.
-
लवकरच रितेशचे नाव श्रीमंतांच्या यादीत सामील झाले. २०१६ मध्ये, ग्राहक तंत्रज्ञान क्षेत्रातील आशियातील फोर्ब्स ३० अंडर ३० यादीत त्यांचे नाव समाविष्ट केले गेले. २०२० मध्ये, तो जगातील सर्वात तरुण स्वयं-निर्मित अब्जाधीश बनला. रितेशची कंपनी OYO Rooms ची सध्या किंमत ८०,००० कोटी रुपये आहे.
(फोटो स्त्रोत: @riteshagar/instagram)
CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”
