-
पृथ्वीवर २४ तासांतून एकदा सूर्य उगवतो आणि मावळतोही. ही प्रक्रिया सुरूच राहते आणि आपण ती लहानपणापासून पाहत आलो असल्याने आपल्याला त्यात काही नवीन वाटत नाही. (Photo: Freepik)
-
आपण अनेकदा लोकांना बोलताना पाहिले आहे की, आज काय सूर्य पश्चिमेला उगवलाय? पण आपल्याला माहीत असते की, तो पूर्वेकडूनच उगवतो.(Photo: Freepik)
-
पण, तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, की खरेच जर सूर्य पूर्वेऐवजी पश्चिमेला उगवला, तर पृथ्वीवर काय परिणाम होतील? चला तर आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ.(Photo: Freepik)
-
विज्ञानानुसार, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरू लागेल. आणि असे झाल्यास त्याचे पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात.(Photo: Freepik)
-
जसे जोरात वारा वाहणे आणि समुद्रात त्सुनामीची तीव्र परिस्थिती निर्माण होणे. पृथ्वीवरही गंभीर बदल झाल्याचे दिसून येतील.(Photo: Freepik)
-
उदाहरणार्थ, आज दक्षिण अमेरिकेत दिसणारी हिरवीगार जंगले वाळवंटात बदलतील. समुद्राच्या लाटांच्या दिशा बदलतील आणि वारे विरुद्ध दिशेने वाहू लागतील.(Photo: Freepik)
-
असे झाले, तर काही वर्षांत पृथ्वीवरील वाळवंट हिरव्यागार वन क्षेत्रासारखे बनण्याची शक्यता आहे. किंबहुना जेव्हा वाऱ्यांमध्ये बदल होईल, तेव्हा तापमानातही बदल होईल. (Photo: Freepik)
-
म्हणजेच जे भाग आज खूप थंड आहेत, ते उष्ण होतील आणि जे भाग आज खूप उष्ण आहेत, ते खूप थंड होतील.(Photo: Freepik)
-
दरम्यान, काळजी करण्याची गरज नाही. कारण- जोपर्यंत एक प्रचंड उल्का पृथ्वीवर आदळत नाही आणि तिची कक्षा पूर्णपणे विस्कळित करीत नाही तोपर्यंत पृथ्वी दिशा बदलण्याची शक्यता नाही, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.(Photo: Freepik)

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या