-
सध्या साऱ्या जगाच्या नजरा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागल्या असून त्यासाठी ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सध्या रिपब्लिकन पक्षाकडून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणूक रिंगणात आहेत. (इंडियन एक्सप्रेस फोटो अमित मेहरा)
-
निवडणुकीच्या मैदानात डोनाल्ड ट्रम्प यांची लढत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्याबरोबर आहे. सध्या दोन्ही उमेदवार जनतेला आकर्षित करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावत आहेत. अमेरिकेत होणाऱ्या या अध्यक्षीय निवडणुकीची भारतातही जोरदार चर्चा आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष म्हणून भारतीयांना कोणाकडे पाहणे आवडेल ते जाणून घेऊया. (इंडियन एक्सप्रेस फोटो अमित मेहरा)
-
देशाच्या राजधानी दिल्लीतील दिलशाद गार्डनमधील काही छायाचित्रे समोर आली आहेत. अमेरिकेतील निवडणुकांसाठी भारतात हवन केले जात असल्याचे या छायाचित्रांमध्ये पाहायला मिळत आहे. (इंडियन एक्सप्रेस फोटो अमित मेहरा)
-
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवायचे आहे. (इंडियन एक्सप्रेस फोटो अमित मेहरा)
-
या छायाचित्रांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो असून निवडणुकीतील विजयासाठी त्यांची पूजा केली जात आहे. (इंडियन एक्सप्रेस फोटो अमित मेहरा)
-
डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री कोणापासून लपलेली नाही. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाले होते. (इंडियन एक्सप्रेस फोटो अमित मेहरा)
-
पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्री अनेक प्रसंगी जगजाहीर झाली आहे. त्यामुळेच भारतीयांनाही डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या सिंहासनावर बसलेले पाहायचे आहेत. (इंडियन एक्सप्रेस फोटो अमित मेहरा)
-
या चित्रांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी करण्यासाठी भारतात हवन आणि पूजा कशी केली जात आहे ते आपण पाहू शकतो.
-
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी भारतात हवन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही एका रॅलीदरम्यान त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प लवकर बरे व्हावेत यासाठी हवन करण्यात आले होते. (इंडियन एक्सप्रेस फोटो अमित मेहरा)
-
यासोबतच डोनाल्ड ट्रम्प लवकर बरे व्हावेत यासाठी हिंदू आर्मीतर्फे दिल्लीतील दिलशाद गार्डनमध्ये महामृत्युंजय जाप हवन यज्ञही करण्यात आला आहे. (अमित मेहरा यांचे इंडियन एक्सप्रेस फोटो)
हेही पाहा- मटण-चिकन नाही तर बांगलादेशी लोक ‘या’ प्राण्याचे मांस सर्वाधिक प्रमाणात खातात

Donald Trump : ‘तर पुन्हा १९२९ सारखी महामंदी येईल’; ट्रम्प यांचा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकन न्यायालयांना इशारा