-
Shree Vitthal Rukmini Temple Pandharpur: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
-
श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल सभा मंडप, मंदिरातील आतील व बाहेरील बाजूस, श्री संत नामदेव पायरी या ठिकाणी तिरंग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
-
याशिवाय, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, श्री संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास इत्यादी ठिकाणी देखील रोषणाई करण्यात आली आहे.
-
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
-
हे मंदिर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरात भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठी वसलेले आहे.
-
आषाढी एकादशीला लाखो वारकरी भक्त मोठ्या भक्तिभावाने वारी करतात.
-
विठू नामाचा गजर करत असंख्य पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत.
-
संपूर्ण महाराष्ट्रातून आणि इतर राज्यांतून पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांचा हा उत्सव विशेष प्रसिद्ध आहे.
-
‘’बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥’ या अभंगाची प्रचीती आज प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्यनेमाने घेत असतो.
-
पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर अधिकृत)

“प्रिय डोनाल्ड…”, NATO प्रमुखांनी पाठवलेला खासगी संदेश ट्रम्प यांनी केला जगजाहीर!