-
झेरोधाचे सह-संस्थापक नितीन कामथ यांनी एनएसई, एमएसईआय आणि चेन्नई सुपर किंग्ज सारख्या प्री-आयपीओ कंपन्यांमध्ये गुंतवणूकीतून अपेक्षित लिस्टिंगचा फायदा घेऊन नफा मिळवू शकतो, अशी अपेक्षा ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांबाबत चिंता व्यक्त केली आहे.
-
याचबरोबर, एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये नितीन कामथ यांनी म्हटले आहे की, गुंतवणूकदारांना हे जितके सोपे वाटते, तितके सोपे नाही.
-
नितीन कामथ यांनी शेअर केलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, “अनलिस्टेड शेअर प्लॅटफॉर्म्स अपारदर्शक आहेत. ते सामान्यतः नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), चेन्नई सुपर किंग्ज, बोट, ओयो रूम्स इत्यादी सारख्या अनलिस्टेड शेअर्सचा पुरवठा एकत्रित करतात, किंमतीत मार्कअप जोडतात आणि नंतर ते विकतात.”
-
“हे प्लॅटफॉर्म्स मार्कअप्स व्यतिरिक्त, कमिशन देखील आकारतात. बर्याच प्रकरणांमध्ये, मार्कअप्स आणि कमिशन ३०–४०% ते १००–२००% पर्यंत असू शकतात. यातील कोणालाही काहीही कळण्याचा मार्ग नाही”, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे.
-
“लोकप्रियतेमुळे वेल्थ मॅनेजर्सनी मल्टीबॅगर म्हणून अनलिस्टेड कंपन्यांची विक्री करण्यास सुरुवात केली. या मागणीचा अर्थ असा झाला की, वेल्थ मॅनेजर्स आणि अनलिस्टेड शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कमिशनसह अधिक किमतीला शेअर्स विकून अज्ञानी गुंतवणूकदारांकडून पैसे कमवत होते.”
-
लिस्टेड कंपनी म्हणजे काय: जेव्हा एखादी कंपनी स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड असते, तेव्हा तुम्ही तुमच्याकडे डीमॅट खाते असल्यास शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकता. म्हणूनच यासाठी “लिस्टेड शेअर्स” हा शब्द आहे.
-
नावाप्रमाणेच, सूचीबद्ध नसलेल्या शेअर्सना अनलिस्टेड शेअर्स म्हणतात. या शेअर्सच्या व्यवहारासाठी कोणतेही एक्सचेंज नसते.
-
अनलिस्टेड शेअर्ससाठी कोणतीही निश्चित किंमत नसते. त्याची किंमत विक्रेता ठरवेल तीच असते. तेथे स्टॉक एक्सचेंजप्रमाणे पारदर्शक किंमत नसते.
-
कामथ यांनी शेअर केलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनलिस्टेड शेअर्स असणे ही देखील कर समस्या आहे. “तुम्हाला लाभांशाचा मागोवा मॅन्युअली ठेवावा लागतो आणि शेअर्स विकताना योग्य मूल्याची गणना देखील करावी लागते.” (सर्व फोटो सौजन्य: @Nithin0dha/X)
)

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”