-
दरवर्षी असंख्य भारतीय विद्यार्थी अमेरिकेत स्वप्ने घेऊन करिअर घडवण्यासाठी जातात. पण प्रत्येकाला पदवीधर झाल्यानंतर लगेचच नोकरी मिळेल, असे नाही.
-
नोकरीची अस्थिर बाजारपेठ, मर्यादित एच-१बी व्हिसाच्या संधी आणि इतर विविध समस्यांमुळे त्यांना कठीण पर्यायांना तोंड द्यावे लागते, कमी पगाराच्या नोकरीत समाधान मानावे लागते किंवा घरी परतावे लागते.
-
आकांक्षा आणि वास्तव यांच्यातील वाढत्या दरीवर प्रकाश टाकत, एका रेडिट युजरने याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
-
या युजरने पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मला ३ वर्षांचा कामाचा अनुभव आहे. मी २०२३ पर्यंत टीसीएसमध्ये काम करत होतो. त्या वर्षी मी अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी सुट्टी घेतली, येथे नोकरी मिळवण्याचे माझे ध्येय होते.”
-
तो पुढे म्हणाला की, “मी माझी पदवी दीड वर्षात पूर्ण केली आणि गेल्या ६ महिन्यांपासून मी नोकरी शोधत आहे. परंतु बाजारातील अस्थिरतेमुळे मला यश मिळाले नाही.”
-
युजरने त्याच्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, “आता मी भारतात परतण्याचा आणि टीसीएसमध्ये पुन्हा नोकरी सुरू करण्याचा विचार करत आहे.”
-
“पण नवीन बेंच पॉलिसी, जिथे ३५ दिवसांपेक्षा जास्त काळ बेंचवर असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाऊ शकते, यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे,” असेही या युजरने पोस्टमध्ये नमूद केले आहे.
-
“सध्याची परिस्थिती पाहता, मला काळजी वाटते की मी माझी नोकरी आणि माझे अमेरिकन स्वप्न दोन्ही गमावू शकतो. मी खरोखर गोंधळलेलो आहे आणि मार्गदर्शन किंवा सूचनांसाठी मी आभारी आहे.”
-
दरम्यान, या रेडिट युजरने शेअर केलेल्या पोस्टवर असंख्य इतर युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये काही सकारात्मक, तर काही नकारात्मक प्रतिक्रिया आहेत. (सर्व फोटो सैजन्य: रॉयटर्स)

Shefali Jariwala Death : पोलिसांनी नोंदवला शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागीचा जबाब