-
युपीआय पेमेंट्सपासून ते तात्काळ तिकीट बुकिंगपर्यंत १ जुलै २०२५ पासून काही महत्वाच्या गोष्टींमध्ये बदल होत आहेत. (Photo: Pexels)
-
या बदलांचा परिणाम थेट आर्थिक व्यवहारांवर होणार आहे, चला तर मग जाणून घेऊया उद्यापासून काय काय बदलणार आहे. (Photo: Pexels)
-
पॅन कार्ड
नवीन पॅन कार्ड (Pan Card) साठी अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य असणार आहे. (File Photo) -
तात्काळ तिकीट
मोबाईल ॲपवरून तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी आता ‘आधार पडताळणी’ (Aadhaar Verification) आवश्यक असेल. तुम्ही तिकीट ऑनलाइन बुक करत असाल किंवा रेल्वे आरक्षण काउंटरवरून (PRS Counter) तिकीट घेत असाल, तरी तुम्हाला OTP टाकावा लागणार आहे. (File Photo) -
घरगुती गॅस
१४ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती बऱ्याच काळापासून तशाच आहेत. त्यांच्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याचबरोबर विमान इंधनाच्या किमतीत देखील बदल होऊ शकतात. ज्याचा परिणाम विमानाप्रवास शुल्कावर होणार आहे. (Photo: Pexels) -
युपीआय चार्जबॅक
आत्तापर्यंत कोणत्याही व्यवहारांमध्ये चार्जबॅकसाठी क्लेम रिजेक्ट केल्यास बॅंकेला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून परवानगी घेत पुन्हा प्रक्रिया करावी लागत होती. आता २० जून २०२५ च्या नियमांनुसार बॅंके स्वत: योग्य चार्जबॅक क्लेमची प्रक्रिया दुसऱ्यांदा करु शकणार आहे. (Photo: Pexels) -
एचडीएफसी
एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट वापरकर्त्यांना युटिलिटी बिल पेमेंट करण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. याशिवाय, एचडीएफसी क्रेडिट कार्ड वापरून डिजिटल वॉलेटमध्ये (Paytm, Mobikwik, Freecharge किंवा Ola Money) एका महिन्यात १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास १ टक्के शुल्क आकारले जाईल. (File Photo) -
आयसीआयसीआय बँक
मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या ५ मोफत व्यवहारांच्या मर्यादेनंतर आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास २३ रुपये शुल्क लागू होईल. मेट्रो नसलेल्या शहरांमध्ये, ही मर्यादा तीन निश्चित करण्यात आली आहे. (File Photo)

Indian Woman : भारतीय तरुणीने दाखवलं कॅनडातल्या रोजगाराचं वास्तव, म्हणाली, “ज्यांना वाटतं इथे नोकऱ्या आहेत त्यांनी…”