-
जगप्रसिद्ध लाबुबू डॉलची (Labubu Doll)सुरुवात एका साध्या स्केचबूकपासून झाली होती हे तुम्हाल माहिती आहे का? हाँगकाँगमध्ये जन्मलेले कलाकार केसिंग लंग यांनी तयार केलेले हे पात्र जागतिक पॉप-कल्चर सेन्सेशन बनले आहे आणि यामुळेच पॉप मार्टचे संस्थापक वांग निंग आता चीनमधील टॉप १० अब्जाधीशांपैकी एक आहेत. (छायाचित्र स्रोत: फोर्ब्स)
-
एका स्केचमधील बाहुली कोट्यवधी रुपयांची कशी झाली?
केसिंग लंग यांच्या ‘द मॉन्स्टर्स’ या पुस्तकातील (सीरिज) लाबुबू हे एक लहान एल्फसारखे पात्र आहे. (छायाचित्र स्रोत: पॉपमार्ट/इन्स्टाग्राम) -
नॉर्डिक परीकथांपासून प्रेरित होऊन हे पात्र वांग निंग यांची कंपनी पॉप मार्टने 3D स्वरूपात सादर केले आणि नंतर गोंडस पण खोडकर दिसणाऱ्या ब्लाइंड-बॉक्स खेळण्यांच्या रूपात बाजारात आणले. (छायाचित्र स्रोत: फोर्ब्स)
-
या बाहुल्यांनी अल्पावधीतच आशिया, युरोप आणि अमेरिकेत खळबळ उडवून दिली. (छायाचित्र स्रोत: पॉपमार्ट/इन्स्टाग्राम)
-
वांग निंगच्या संपत्तीत भर
२०२४ मध्ये वांग निंग यांची एकूण संपत्ती ७.५९ अब्ज डॉलर्स इतकी होती, जी फक्त एका वर्षात २२.१ अब्ज डॉलर्सपर्यंत (तब्बल १.८४ लाख कोटी) पोहोचली आहे. (छायाचित्र स्रोत: फोर्ब्स) -
फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार वांग निंग आता चीनमधील १० व्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आणि सर्वात तरुण (३८ वर्षांचा) अब्जाधीश देखील आहे. (छायाचित्र स्रोत: पॉपमार्ट/इन्स्टाग्राम)
-
एका लाबुबू बाहुलीची किंमत १.२ कोटी रुपये
जगभरात लाबुबू डॉल्सच्या चाहत्यांची कमतरता नाही. अलीकडेच, बीजिंगमध्ये एका मानवी आकाराच्या लाबुबू बाहुलीचा लिलाव झाला. ही बाहुली १.०८ मिलियन युआन (१,५०,२७५ डॉलर्स म्हणजेच १.२ कोटी रुपये) मध्ये विकण्यात आली. (छायाचित्र स्रोत: फोर्ब्स) -
सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेला चालना मिळाली
के-पॉप ग्रुप ब्लॅकपिंकची सदस्य लिसा तिच्यासोबत दिसल्याने लाबुबूची लोकप्रियता आणखी वाढली. यानंतर किम कार्देशियन, रिहाना, दुआ लिपा सारख्या आंतरराष्ट्रीय स्टार्सनीही सोशल मीडियावर लाबुबू डॉल्सचा प्रचार केला, ज्यामुळे या डॉल्सची मागणी आणखी वाढली. (छायाचित्र स्रोत: पॉपमार्ट/इन्स्टाग्राम) -
कसे आहे पॉप मार्टचे व्यवसाय मॉडेल?
पॉप मार्टचे मुख्य व्यवसाय मॉडेल ‘ब्लाइंड बॉक्स’ आहे, ज्यामध्ये ग्राहकांना कोणती बाहुली मिळेल हे माहित नसते. हे आश्चर्यचकित करणारे घटक ग्राहकांना पुन्हा पुन्हा खरेदी करण्यास प्रेरित करते. याशिवाय, कंपनी वेळोवेळी या डॉल्सच्या मर्यादित आवृत्त्या जारी करते, ज्यामुळे या डॉल्सचे बाजार मूल्य अनेक पटींनी वाढते. (छायाचित्र स्रोत: फोर्ब्स)

चॅनेलने ना बाहेर काढलं, ना डच्चू दिला…! शरद उपाध्येंच्या ‘त्या’ आरोपांवर निलेश साबळेचं प्रत्युत्तर; म्हणाला, “झी मराठी’मध्ये…”