-
वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. आंद्रे रसेलची ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. मात्र, तो या मालिकेतील केवळ २ सामने खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. (Photo: Andre Russell/Instagram)
-
दरम्यान, त्याच्या क्रिकेट कारकिर्दीव्यतिरिक्त, हा स्टार क्रिकेटपटू त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे देखील चर्चेत असतो. (Photo: Jassym lora russell/Instagram)
-
विशेषतः त्याची पत्नी जस्सिम लोराचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स आहेत. (Photo: Jassym lora russell/Instagram)
-
आंद्रे रसेलची पत्नी कोण आहे?
मॉडेल आणि फॅशन इन्फ्लुएंसर जस्सिम लोरा ही आंद्रे रसेलची पत्नी आहे. (Photo: Jassym lora russell/Instagram) -
यामुळे लोकप्रिय
जस्सिमने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिचे इंस्टाग्रामवर ३३९ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo: Jassym lora russell/Instagram) -
ती फिटनेस कंटेंट, लाइफस्टाइल टिप्स आणि प्रवासाचे क्षण शेअर करते. तिचे जगभरात चाहते आहेत. (Photo: Jassym lora russell/Instagram)
-
लग्न
जस्सिम आणि आंद्रेनी काही वर्ष डेट केल्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी लग्न केले. (Photo: Jassym lora russell/Instagram) -
मुलगी अमाया
२०२० मध्ये त्यांची मुलगी अमायाचा जन्म झाला. जस्सिम अनेकदा आयपीएल सामन्यांमध्ये रसेलला पाठिंबा देते. ती तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. (Photo: Jassym lora russell/Instagram) -
जस्सिम क्रिकेट स्पर्धांमध्ये तिच्या सौंदर्याने, प्रभावाने आणि करिष्म्याने सर्वांचे लक्ष वेधून घेते. (Photo: Jassym lora russell/Instagram)
-
घर
जस्सिम आणि रसेल किंग्स्टन जमैकामधील एका आलिशान घरात राहतात. (Photo: Jassym lora russell/Instagram) हेही पाहा- अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

Paras Hospital Case : पाच जणांची टोळी अन् प्रत्येकाच्या हातात शस्त्र; रुग्णालयात जाऊन घातल्या गोळ्या, हत्येचा लाईव्ह थरार सीसीटीव्हीत कैद