-
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना कृषीमंत्री (Agriculture minister) माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा मोबाईलवर रमी (Rummy) खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्याने ते सध्या प्रचंड चर्चेत आले आहेत.
-
यापूर्वी त्यांचे शेतकऱ्यांबद्दल केलेली विधानेही बरीच चर्चेत आली होती. यामुळे आता विरोधकांकडून (Opposition) त्यांच्या राजीनाम्याची (Resignation) मागणी जोर धरते आहे.
-
काही वेळापूर्वीचं झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी “मी सभागृहात रमी खेळलो असं वाटत असेल तर याप्रकरणी तपास करावा. मी ऑनलाइन रमी (Online rummy) खेळत असेन, मी यामध्ये दोषी आढळलो आणि त्यानंतर मुख्यमंत्री (CM) अथवा उपमुख्यमंत्र्यांनी (DCM) येणाऱ्या नागपूर अधिवेशनात (हिवाळी) यावर निवेदन दिलं. तर मी थेट राज्यपालांकडे जाऊन माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करेन.”
-
दरम्यान, माणिकराव कोकाटे हे नाशिकमधल्या (Nashik) सिन्नरचे (Sinnar MLA) आमदार आहेत. आज आपण माणिकराव कोकाटे यांच्याकडील मालमत्तेची (Net Worth) माहिती घेऊयात.
-
२०२४ निवडणूक प्रतिज्ञापत्रातील (Election Affidavit) माहिती जी मायनेता डॉट इन्फो (Myneta.info) या वेबसाईटवर आहे, त्यानुसार कोकाटे बीएससी, एलएलबी (BSC, LLB) शिकले आहेत.
-
रोख
त्यांच्या कुटुंबाकडे ३१ लाख ३५ हजार रूपयांची रोख (Casg) आहे. तर ३६ लाख ७५ हजार रुपयांच्या बँकेत ठेवी (Bank Deposites) आहेत. -
गुंतवणूक
त्यांनी ४ कोटी ७८ लाख ६३ हजार २४४ रुपये बॉण्ड आणि शेअर्समध्ये (Bond and Shares) गुंतवले (Investment) आहेत. तर त्यांच्या पोस्ट ऑफिस खात्यामध्ये (Post Office Account) १ लाख ६० हजार रुपये आहेत. -
चल संपत्ती
महिंद्रा थार, (Mahindra Thar) इनोव्हा हायक्रॉस, (Innova Hycros) बुलेट (Bullet) व सोनालिका ट्रॅक्टर (Sonalika) तसेच सोने (Gold) मिळून ११ कोटी ७३ लाख ७० हजार ५६५ रुपयांची चल संपत्ती -
अचल संपत्ती
शेती, (Farm) बिगर शेतजमीन, रहिवाशी इमारती मिळून ३१ कोटी ५ लाख ४ हजार रुपये इतकी अचल संपत्ती आहे. -
एकूण संपत्ती व कर्ज
माणिकराव कोकाटेंच्या नावे ४८ कोटी ३६ लाख ४१ हजार ८२९ रूपयांची एकूण संपत्ती आहे, तर ७ कोटी ७५ लाख ४६ हजार ६८९ रुपयांचं कर्ज आहेत. (सर्व फोटो साभार- माणिकराव कोकाटे फेसबुक) हेही पाहा- Ajit Pawar Birthday: अनेकांची शाळा घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार कितवी पास आहेत? बारामती, गिरगाव ते कोल्हापूर; कुठे झालंय शिक्षण?

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…