-
Kargiil Vijay Diwas 2025 : ३ मे १९९९, या दिवशी भारताच्या लष्कराला पाकिस्तानी दहशतवादी व सैनिकांच्या घुसखोरीबद्दल कळले. काही स्थानिक मेंढपाळांनी भारतीय सैन्याला याबद्दल माहिती दिली होती. ८४ दिवस चाललेल्या संघर्षानंतर, २६ जुलै १९९९ रोजी भारताने विजय मिळवला. या ८४ दिवसांची संपूर्ण गोष्ट समजून घेऊया…
-
२६ जुलै २०२५ रोजी कारगिल युद्धाला २६ वर्षे पूर्ण झाले आहेत. हा दिवस होता पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध जिंकण्याचा. ज्या भागात हे युद्ध झाले त्या भागात हिवाळ्यात तापमान उणे ३० ते उणे ४० अंश सेल्सिअस पर्यंत असते. हिवाळ्यामध्ये हा भाग रिकामा करण्यात आला होता. याचा फायदा घेत पाकिस्तानकडून घुसखोरी करण्यात आली. पाकिस्तानच्या सैन्यानेही या घुसखोरीला पाठींबा दिला होता. (Express archive photo)
-
३ मे रोजी घुसखोर दिसल्यानंतर, भारतीय लष्कराने ५ मे १९९९ रोजी घुसखोरी क्षेत्रात गस्त घालणारे सैनिकांचे एक पथक पाठवले. गस्त घालणारे पथक घुसखोरी क्षेत्रात पोहोचताच घुसखोरांनी पाचही सैनिकांना ठार मारले. सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या मृतदेहांचीही क्रूरपणे विटंबना करण्यात आली. घुसखोरांना लेह-श्रीनगर महामार्ग ताब्यात घ्यायचा होता. याद्वारे लेहला उर्वरित भारतापासून तोडायचा त्यांचा डाव होता. (Express archive photo)
-
९ मे रोजी कारगिल जिल्ह्यात पाकिस्तानी तोफखान्याने भारताचा दारूगोळा डेपो उडवून दिला. (Express archive photo)
-
१० मे १९९९ रोजी द्रास, काकसर, बटालिक सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोर दिसले. घुसखोरांनी त्यावेळी सुमारे ६०० ते ८०० भारतीय चौक्यांवर कब्जा केल्याचा अंदाज सैन्याला आला. (Express archive photo)
-
१५ मे १९९९ नंतर, काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात सैन्य पाठवण्यास सुरुवात झाली. (Express archive photo)
-
२६ मे रोजी, भारतीय हवाई दलाने घुसखोरांवर जोरदार बॉम्बहल्ला केला. (Express archive photo)
-
२७ मे रोजी पाकिस्तानी सैन्याने दोन भारतीय लढाऊ विमाने पाडली. फ्लाइट लेफ्टनंट के. नचिकेता यांना पाकिस्तानने युद्धकैदी बनवले. तर स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांनी सर्वोच्च बलिदान दिले. (Express archive photo)
-
३१ मे १९९९ रोजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एक विधान केले. त्यांनी म्हटले की काश्मीरमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. (Express archive photo)
-
४ जुलै रोजी भारतीय सैन्याने टायगर हिल्सवर तिरंगा फडकावला. सुमारे ११ तासांच्या सातत्यपू्र्ण युद्धानंतर, भारतीय सैन्याने ही महत्त्वाची चौकी ताब्यात घेतली. (Express archive photo)
-
५ जुलै रोजी भारतीय सैन्याने द्रास सेक्टर ताब्यात घेतला. हा सेक्टर सामरिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा होता. ७ जुलै रोजी भारतीय सैन्याने बाटलिक सेक्टरमधील जुब्बार टेकडी पुन्हा परत मिळवली. ७ जुलै रोजी, दुसऱ्या एका ऑपरेशन दरम्यान, कॅप्टन विक्रम बात्रा यांनी सर्वोच्च बलिदान दिले. (Express archive photo)
-
११ जुलै रोजी, भारतीय सैन्याने बाटलिक सेक्टरमधील जवळजवळ सर्व टेकड्या परत मिळवल्या. (Express archive photo)
-
१२ जुलै रोजी, युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताशी चर्चेचा प्रस्ताव दिला. (Express archive photo)
-
१४ जुलै रोजी, भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला भारतीय हद्दीतून पूर्णपणे हाकलून लावले. भारताने सर्व प्रदेश परत मिळवले. २६ जुलै रोजी भारताने कारगिल युद्धात विजयाची घोषणा केली. (Express archive photo)
-
१८ हजार फूट उंचीवर लढलेले हे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्याची गाथा सांगते. (Express archive photo) हेही पाहा- Amazon Salary Revealed : इंजिनिअर ते मॅनेजर; अॅमेझॉन कोणाला किती देते पगार? कर्मचाऱ्यांच्या वेतनाची माहिती उघड…

“जेवढं मिळतंय त्यात आनंद मानायला शिका”; आयुष्यात सतत तक्रार करणाऱ्यांनो चिमुकलीचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी