-
Three terrorists killed in Operation Mahadev: आज भारतीय सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमधील लिडवास येथे पहलगाम हल्ल्यातील ३ संशयित दहशतवाद्यांना ठार केले आहे. लिडवास येथील नागरी भागात चिनार कॉर्प्सने ही कामगिरी केली आहे. (संग्रहित फोटो)
-
खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक मुसा आहे. हाशिम मुसा हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे म्हटले जाते. याबाबत इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. (संग्रहित फोटो)
-
पहलगाम या ठिकाणी एप्रिल महिन्यात निष्पाप पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. (संग्रहित फोटो)
-
या हल्ल्यात २६ पर्यटकांना धर्म विचारुन ठार करण्यात आलं होतं. या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचं कळल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख उत्तर दिलं होतं. (संग्रहित फोटो)
-
आता या हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
-
हे स्केच आसिफ फौजी, सलमान शाह आणि अबू तल्हा या दहशतवाद्यांचे आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममधील दरीच्या सभोवतालच्या घनदाट पाइन जंगलातून कुर्ता पायजमा घातलेले किमान ५ ते ६ दहशतवाद्यांनी बैरसन याठिकाणी एके ४७ ने पर्यटकांवर गोळीबार केला होता. (संग्रहित फोटो)
-
ऑपरेशन महादेव
ज्या भागात ही कारवाई करण्यात आली त्या भागात ‘महादेव’ नावाचे शिखर (डोंगराचे नाव) आहे. त्या भागात ही कारवाई झाल्यामुळे या कारवाईला ‘ऑपरेशन महादेव’ असे नाव देण्यात आले असल्याचे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (संग्रहित फोटो) हेही पाहा- प्रांजल खेवलकरांच्या लिमोझिन कारच्या वादामध्ये एकनाथ खडसेंनी दिलेला जावयाला पाठिंबा; काय होतं ते प्रकरण?

“गरिबासाठी कोण नाही पण देव असतो” अवघ्या ५ सेकंदात कार चालकाला देवानं दिलं कर्माचं फळ, असं काय घडलं? पाहा VIDEO