-
टोमॅटोचा उगम टोमॅटोचा उगम दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगेतील पेरू आणि इक्वेडोर या देशांमध्ये झाला. अँडीजमध्ये हजारो वर्षांपूर्वी लहान, चेरी आकाराचे टोमॅटो पिकवले गेले होते.
-
युरोपमध्ये आगमन १६ व्या शतकात, स्पॅनिश अन्वेषकांनी अमेरिकेच्या सफरींनंतर टोमॅटो युरोपमध्ये आणले. तेथे प्रारंभी टोमॅटोंना विषारी मानले जात होते. कारण- ते नाईटशेड कुटुंबातले होते.
-
‘पोझन ॲपल’ मिथक १७ व्या शतकात, श्रीमंत युरोपीय लोक टोमॅटो पिऊटर प्लेट्सवर खात होते. टोमॅटोंतील आम्लतेमुळे प्लेट्समधील लेड बाहेर पडत होते, ज्यामुळे विषबाधा होत होती. त्यामुळे टोमॅटोंना ‘पोझन ॲपल्स’ (विषारी सफरचंद) हे उपनाम मिळाले.
-
अमेरिकेतील लोकप्रियता १८ व्या शतकात अमेरिकेत केचप आणि कॅन केलेले टोमॅटो लोकप्रिय झाले. ते घराघरात वापरले जाऊ लागले. मग ते ताजेपणाचे आणि घरगुती स्वयंपाकाचे प्रतीक बनले.
-
भूमध्य समुद्रातील स्वीकृती इटली आणि स्पेनमध्ये टोमॅटोंचा वापर सॉस, सूप होऊ लागला. १८ व्या शतकात, इटालियन स्वयंपाकात टोमॅटो एक महत्त्वाचा घटक बनला.
-
जागतिक प्रसार व्यापाराच्या वाढीमुळे टोमॅटो आशिया आणि आफ्रिकेत पसरले. भारतामध्ये ते करी आणि चटणीमध्ये महत्त्वाचे घटक बनले. चीनमध्ये टोमॅटो लवकरच सूप आणि स्टिर-फ्रायमध्ये समाविष्ट झाले.
-
आधुनिक टोमॅटो क्रांती आज जगभरात १०,००० हून अधिक प्रकारचे टोमॅटो पिकवले जातात, ज्यात हेरिटेज आणि हायब्रिड प्रकारांचा समावेश आहे. सेंद्रिय शेती आणि टिकाऊपणाच्या प्रगतीसह टोमॅटो जैवविविधता आणि जागतिक खाद्य संस्कृतीचे प्रतीक बनले आहेत.
-
शास्त्र आणि कायदा टोमॅटो तांत्रिकदृष्ट्या फळ आहे.- कारण ते टोमॅटो वनस्पतीच्या फुलापासून विकसित होते आणि त्यात बिया असतात. तथापि, १८९३ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने टोमॅटोंना भाजी म्हणून कर आकारण्याचा निर्णय दिला. कारण- ते स्वयंपाकात भाजी म्हणून वापरले जातात.
-
(सर्व फोटो सौजन्य :पेक्सेल्स)

पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार