पिंपरी- चिंचवड : अजित गव्हाणे यांच्यासह एकूण ३७ माजी नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित गव्हाणे यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. विरोध असताना उमेदवारी मिळवली होती. परंतु, त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. तेव्हा पासून ते पुन्हा स्वगृही परतणार असल्याची जोरदार चर्चा होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत अजित गव्हाणे यांच्यासह एकूण ३७ माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित गव्हाणे यांनी काही माजी नगरसेवकांसह शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान वातावरण निर्मिती केली होती. अजित गव्हाणे हे भोसरीचे सध्याचे आमदार महेश लांडगे यांचा पराभव करतील असा विश्वास व्यक्त केला जात होता. परंतु, त्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला. यानंतर ते पुन्हा अजित पवारांसोबत येणार असल्याचं बोललं जात होतं.
शरद पवारांच्या पक्षात ते ऍक्टिव्ह नव्हते. वारंवार त्यांच्यावर टीका देखील केली जात होती. अखेर त्यांनी ३७ माजी नगरसेवकांसह अजित पवार गटात प्रवेश केला आहे. पुन्हा एकदा अजित पवारांनी शरद पवार गटाला धक्का दिला आहे.