कसबा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी आणि चिंचवड मतदार संघ शिवसेनेला ( उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) द्यावा, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार, प्रवक्ता संजय राऊत यांनी घेतल्याने कसब्यातील संभाव्य इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पुणे: श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिवसेनेच्या विस्तारासाठी कसबा पोटनिवडणूक सुवर्ण संधी आहे. त्यामुळे आत्ता नाही तर पुन्हा कधी ? अशी विचारणा पदाधिकारी करत आहेत.
कसबा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे आणि माजी नगरसेवक तसेच या मतदार संघातून विधानसभेसाठीची अपक्ष निवडणूक लढविलेले विशाल धनवडे यांनी कसब्यातून निवडणूक लढविण्यासंदर्भात आग्रही भूमिका घेतली आहे. कसब्यात शिवसेनेची मोठी ताकद आहे. शिवसेनच्या या ताकदीचा युतीवेळी भारतीय जनता पक्षाला फायदा झाला. कसबा भाजपचा बालेकिल्ला असला तरी शिवसेनेची ताकद दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविताना कसबा शिवेसेनेने घ्यावा, असे राजकीय गणित शिवसेना पदाधिका-यांनी मांडले आहे. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, संपर्क प्रमुख सचिन आहिर, खासदार संजय राऊत यांच्याकडे तशी आग्रही मागणी पदाधिका-यांनी केली आहे. मात्र शिवसेनेला कसब्यातून संधी मिळण्याची शक्यता शिवेसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे धूसर झाली आहे.

हेही वाचा- ‘कोयत्या गँग विरोधात मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू’; चंद्रकांत पाटील यांची माहिती

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिका-यांची बैठक मुंबईत झाली. त्या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कसब्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवावी आणि चिंचवड मतदार संघ शिवसेनेला द्यावा, अशी जाहीर भूमिका मांडली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने या दोन्ही मतदार संघावर दावा केला आहे.

हेही वाचा- पुणे : बीआरटी मार्गावरील बसथांब्यांच्या स्वच्छतेसाठी फिरते वाॅशिंग सेंटर

चिंचवड मधून लढताना शिवसेनेच्या उमेदवाराने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी कडवी लढत दिली होती. शिवसेनेच्या उमेदवाराला एक लाखाहून अधिक मते मिळाली होती. त्यामुळे चिंचवड मतदारसंघ शिवसेनेसाठी योग्य पर्याय आहे, असे राजकीय गणित शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मांडले आहे. त्यामुळे कसब्यातील इच्छुक उमेदवारांची कोंडी झाली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळेल. किंबहुना शिवसेनेची ताकद लक्षात घेऊन वरिष्ठ नेते कसब्यासाठी आग्रही रहातील, अशी अपेक्षा इच्छुक उमेदवार आणि पदाधिका-यांना होती. इच्छुक उमेदवारांची कोंडी झाल्याचे किंवा पदाधिका-यांमध्ये अस्वस्थता नसल्याचे पदाधिका-यांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा- पुण्याच्या कचरा डेपोतील कचऱ्यातून सौरऊर्जा; दैनंदिन ३०० ते ४०० युनिट निर्मिती

‘ संजय राऊत यांनी बैठकीत भूमिका मांडल्यानंतर कसब्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी, अशी मागणी पुन्हा त्यांच्याकडे तातडीने करण्यात आली आहे. कसब्यावर शिवसेनेचाच हक्क आहे. पोटनिवडणूक ही शिवसेनेसाठी सुवर्ण संधी आहे. त्यामुळे आत्ता नाही तर पुन्हा कधी ? अशी विचारणा त्यांच्याकडे राऊत यांच्याकडे केल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay rauts position that the ncp should contest the by election of the kasba assembly constituency has spread uneasiness among the aspirants pune print news apk 13 dpj
First published on: 26-01-2023 at 17:04 IST