scorecardresearch

पुणे : बीआरटी मार्गावरील बसथांब्यांच्या स्वच्छतेसाठी फिरते वाॅशिंग सेंटर

या यंत्रामुळे बीआरटीच्या एका थांब्यावरून दुसऱ्या थांबावर जाऊन कमी वेळेत आणि कमी मनुष्यबळात बसथांबे स्वच्छ करणे कर्मचाऱ्यांना शक्य

Cleaning of bus stops on BRT route through rotates washing center
पीएमपीकडून रोटेट वॉशिंग सेंटरद्वारे बीआरटी मार्गावरील बस थांब्यांची स्वच्छता

बीआरटी मार्गावरील अस्वच्छ बसथांबे पाण्याने स्वच्छ करण्यासाठी पीएमपीकडून फिरत्या वाॅशिंग सेंटरचा वापर होणार आहे. पीएमपीच्या पिंपरी आगारात कार्यरत असलेले बेंच फिटर बाबासाहेब मुलाणी यांनी फिरते वाॅशिंग सेंटर तयार केले असून या यंत्राचा वापर करून बसथांबे स्वच्छ करण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा- दहावी-बारावीच्या प्रश्नपेढीबाबत प्रश्नचिन्ह; एससीईआरटीच्या संकेतस्थळावर गेल्या वर्षीचीच प्रश्नपेढी

पीएमपीच्या यांत्रिक बाबींशी संलग्न काम करणारे अनेक कर्मचारी कल्पकता लढवून कामात सोपेपणा आणण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात. त्यानुसार बेंच फिटर बाबासाहेब मुलाणी यांनी फिरते वाॅशिंग सेंटर तयार केले आहे. विद्युत मोटार, दोन हजार लिटर पाण्याची टाकी आणि अन्य टाकाऊ साहित्यापासून सर्व्हिस व्हॅनमध्ये फिरते वाॅशिंग सेंटर तयार करण्यात आले आहे.

हेही वाचा- पुणे महापालिका भवनासमोरील नदीकाठ परिसर कचऱ्याच्या विळख्यात

या यंत्रामुळे बीआरटीच्या एका थांब्यावरून दुसऱ्या थांबावर जाऊन कमी वेळेत आणि कमी मनुष्यबळात बसथांबे स्वच्छ करणे कर्मचाऱ्यांना शक्य झाले आहे. यंत्र निर्मितीसाठी कोणते साहित्य वापराचे, त्याची रचना कशी करायची यासंदर्भात अभ्यास करून डिझाइन तयार करण्यात आले. त्यानुसार साहित्याचे सुट्टे भाग सर्व्हिस व्हॅनला जोडण्यात आले. सिंगल फेज विजेवर चालणारी मोटार जोडून यंत्र तयार करण्यता आले आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल आगार व्यवस्थापक भास्कर दहातोंडे, आगार अभियंता राजकुमार माने आणि फिटर बाबासाहेब मुलाणी यांचे पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया आणि सह व्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार-पवार यांनी कौतुक केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 13:14 IST

संबंधित बातम्या