लाल रंगाची साडी, भांगेत कुंकू अन्…; ‘कान्स’मध्ये अदिती राव हैदरीच्या पारंपरिक लूकची चर्चा
कान्स फिल्म फेस्टिव्हलची सध्या सर्वत्र चर्चा आहे. १३ मे २०२५ रोजी सुरू झालेला हा महोत्सव २४ मे २०२५ रोजी संपेल. यंदाच्या ७८ व्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक भारतीय कलाकारांनी हजेरी लावली आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरीने लाल साडी आणि पारंपरिक लूकमध्ये रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. अदितीने २०२२ साली पहिल्यांदा कान्समध्ये पदार्पण केले होते.