‘हेरा फेरी ३’मधून परेश रावल यांची Exit झाल्यानंतर दिग्दर्शक प्रियदर्शन यांची प्रतिक्रिया
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी बाबू भैय्याची भूमिका साकारण्यास नकार दिला आहे. यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. परेश रावल आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यात वैचारिक मतभेद असल्याच्या अफवा होत्या, परंतु परेश यांनी हे नाकारले आहे. अक्षय कुमारने परेश यांना २५ कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. प्रियदर्शन यांनी परेशच्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.