आत्महत्या करणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी पोलिसाची कालव्यात उडी; पण दुर्दैवाने बुडून मृत्यू
गाझियाबादमध्ये वाहतूक पोलीस हवालदार अंकित तोमर यांनी आत्महत्या करत असलेल्या महिलेला वाचवताना आपला जीव गमावला. हिंदन कालव्यात उडी घेतलेल्या महिलेला वाचविण्यासाठी तोमर यांनी तात्काळ उडी मारली, परंतु पोहता न आल्याने ते बुडाले. तोमर यांच्या मृत्यूनंतर पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.