गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात, आहे तरी कोण?
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला 'आयसिस काश्मीर'कडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. गंभीरने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि कुटुंबासाठी सुरक्षा मागितली. पोलिसांनी धमकी देणाऱ्या २१ वर्षीय जिग्नेशसिंग परमारला अटक केली आहे. तो गुजरातचा रहिवासी आणि इंजिनीयरिंगचा विद्यार्थी आहे. पोलिस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.