“बेस्ट दुप्पट दरवाढीला आमचा विरोध”, ठाकरेंच्या शिवसेनेची थेट भूमिका
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात दुप्पटीने वाढ होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या भाडेवाढीवर टीका केली आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर बेस्ट बससेवेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी भाडेवाढीचा प्रस्ताव मांडला होता, ज्यामुळे बेस्टचे वार्षिक उत्पन्न १४०० कोटींवर जाण्याची शक्यता आहे.