“वाह फडणवीस वाह, असा काय नाईलाज आहे की…”, छगन भुजबळांच्या शपथविधीवर अंजली दमानियांचा सवाल!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची अखेर मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यांना धनंजय मुंडे यांचं अन्न व नागरी पुरवठा खातं मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी भुजबळांच्या समावेशावरून मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली आहे. नाशिक व रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे. रायगडचं पद गोगावलेंना मिळाल्यास नाशिकचं पद भुजबळांना मिळू शकतं.