सलील कुलकर्णींच्या ‘एकदा काय झालं’चा तेलुगूमध्ये रिमेक, शेअर केली खास पोस्ट
लोकप्रिय गायक आणि गीतकार सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या गाण्यांनधून आणि कवितांमधून रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्यांनी 'आयुष्यावर बोलू काही'चे कार्यक्रम केले आहेत. शिवाय त्यांनी 'वेडिंगचा सिनेमा' आणि 'एकदा काय झालं' या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या 'एकदा काय झालं' या चित्रपटाला ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा मानही मिळाला आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचा तेलुगूमध्ये रिमेक झाला आहे, याबद्दल सलील यांनी स्वत: पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.