पूजा करताना आला हृदयविकाराचा झटका, ४५ वर्षीय अभिनेत्याचं निधन
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिनेश यांचा मुलगा, अभिनेता गिरी दिनेशचे ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'नवग्रह' चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या गिरी दिनेशने शुक्रवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या आकस्मिक निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. गिरी दिनेशने 'बारे नन्ना मुदिना रानी' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती आणि 'नवग्रह' चित्रपटात शेट्टीची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली होती.