मल्याळम इंडस्ट्री ड्रग्जच्या विळख्यात? प्रसिद्ध निर्मातीने केले धक्कादायक खुलासे, म्हणाली…
मल्याळम सिनेसृष्टीतील ड्रग्जच्या वापराबद्दल अभिनेत्री आणि निर्मात्या सँड्रा थॉमस यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, चित्रपटांच्या बजेटमधून ड्रग्जसाठी विशेष बजेट ठरवलं जातं आणि सेटवर यासाठी स्वतंत्र खोल्याही बनवल्या जातात. संबंधित संघटनांनी याविरुद्ध पावले उचलली नाहीत, असेही त्यांनी म्हटले. पुरुष असो वा महिला, प्रत्येकजण ड्रग्जचं सेवन करतो. निर्माते कलाकारांविरुद्ध तक्रार करण्यास घाबरतात, कारण यामुळे चित्रपट थांबण्याची भीती असते.