२१ मे हा दिवस राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन म्हणून का पाळला जातो? काय आहे ऐतिहासिक संदर्भ?
राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पाळला जातो. २१ मे १९९१ रोजी त्यांच्या मृत्यूनंतर माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या कार्यकाळात याची सुरुवात झाली. या दिवशी दहशतवाद व हिंसेविरुद्ध शपथ घेणे, चर्चासत्रे, संवाद, सेमिनार आयोजित केले जातात. एकतेचे तत्त्व अधोरेखित करून शांतता व सुसंवादावर भर दिला जातो. दहशतवादाविरोधातील लढ्यात मानवी हक्क व कायद्याची तत्त्वे शाबूत ठेवण्याची गरज अधोरेखित केली जाते.