scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

बीसीसीआय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) ही भारतातील क्रिकेट खेळासाठीची राष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. या संघटनेद्वारे देशामध्ये क्रिकेट संबंधित सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवले जाते. १७५१ मध्ये भारतातील पहिला क्रिकेटचा सामना खेळला गेला असे म्हटले जाते. १७९२ मध्ये कोलकाला क्रिकेट क्लबची स्थापना झाली. हळूहळू भारतामध्ये क्रिकेट क्लब्सची स्थापना होत गेली. १९१२ मध्ये भारतीय संघाचा पहिला दौरा इंग्लंड येथे नेण्यात आला होता. पटयालाचे महाराज या संघाचे नेतृत्त्व करत होते. दरम्यानच्या भारतामध्ये क्रिकेट खेळाबाबत लोकांमध्ये कुतूहल निर्माण होत गेले. देशभरात या खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी देशातील विविध भागातून क्रिकेट क्लब्समधील प्रतिनिधी धडपड करु लागले. पटयाला, दिल्ली, बडोदा, पंजाब अशा वेगवेगळ्या प्रांतातील प्रतिनिधींद्वारे २१ नोव्हेंबर १९२७ मध्ये दिल्लीमध्ये एका बैठकीचे आयोजन केले गेले. या बैठकीमध्ये भारतामध्ये क्रिकेट बोर्डची स्थापना व्हावी यावर सर्वांचे बहुमत झाले. यातून पुढे डिसेंबर १९२८ मध्ये बीसीसीआय म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली. १९३० मध्ये मद्रास सोसायटी अ‍ॅक्ट अंतर्गत बीसीसीआयची अधिकृत नोंदणी करण्यात आली. आर.ई. ग्रँट गोवन हे बीसीसीआयचे पहिले अध्यक्ष होते. सौरव गांगुलीनंतर रॉजर बिन्नी या संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड्सपैकी एक आहे. मुंबईमधील वानखेडे स्टेडियमजवळ बीसीसीआयचे मुख्यालय आहे.Read More
ind vs pak
Profit vs Patriotism: भारतीय संघ आशिया चषकात पाकिस्तान विरुद्ध का खेळत आहे?

India vs Pakistan: आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दरम्यान हा सामना भारतीय संघ का…

Asia Cup india pakistan match controversy prominent figures boycott sports news
…हा तर अदृश्य बहिष्कार

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आशिया चषक स्पर्धेचा सामना आज रंगणार असला तरी पदाधिकारी, प्रतिष्ठितांनी या लढतीकडे सामान्य प्रेक्षकांप्रमाणे…

harbhajan singh
BCCI President: हरभजन सिंग होणार BCCI अध्यक्ष? माजी खेळाडूकडून मिळू शकतं आव्हान

Harbhajan Singh: भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग देखील बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत हजेरी लावणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर होणार BCCI चा नवा अध्यक्ष? मास्टर ब्लास्टरने अखेर स्पष्ट सांगितलं

Sachin Tendulkar, BCCI President: सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा पुढील अध्यक्ष होणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत आता मोठा खुलासा करण्यात आला…

Shubman Gill Birthday Indian Test Captain Networth Salary income
शेतकऱ्याचा मुलगा झाला ५० कोटींचा मालक! शेतात क्रिकेटचे धडे गिरवणारा शुबमन गिल कुठून कमावतो इतका पैसा?

Shubman Gill Birthday: भारताचा कसोटी कर्णधार शुबमन गिल आज त्याचा २६वा वाढदिवस साजरा करत आहे. गिलची संपत्ती आणि त्याची कमाई…

Rohit Sharma Virat Kohli
Team India: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! विराट- रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

India A vs Australia A: ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानात उतरू शकतात.

Abhishek Nayar Bold Statement on Shreyas Iyer Asia Cup Snub
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरची लॉटरी लागणार? संघात स्थानासह कर्णधारपदाची जबाबदारीही मिळणार

Shreyas Iyer: येत्या काही दिवसात आशिया चषकात आशिया चषकाला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी श्रेयस अय्यरसाठी आनंदाची बातमी समोर येत…

Who Is PVR Prasanth Son and Son in Law Of MLA Becomes Manager Of Team India For Asia Cup 2025
Who is PVR Prasanth: कोण आहे पी.व्ही.आर. प्रशांत? आशिया चषकासाठी भारताच्या ताफ्यात सामील झाला आमदाराचा जावई

PVR Prasanth Team India Manager: आशिया चषक २०२५ साठी भारताच्या ताफ्यात नव्या सदस्याला सामील करण्यात आला आहे, जो माजी आमदाराचा…

Virat Kohli only Indian cricketer to give fitness test in London
Virat Kohli Fitness Test: विराटने इंग्लंडमध्ये दिली फिटनेस टेस्ट, कोहलीसाठी BCCIने नियमात केला मोठा बदल; विदेशात चाचणी देण्यामागचं कारण काय?

Virat Kohli Fitness Test: विराट कोहलीला बीसीसीआयने लंडनमध्ये फिटनेस टेस्ट देण्याची परवानगी दिली आहे. यावरून सध्या चर्चांना उधाण आलं आहे.

ms dhoni t20 world cup
विश्लेषण : पुढील ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी धोनी ‘मेंटॉर’? नियुक्तीसाठी ‘बीसीसीआय’ उत्सुक, पण प्रशिक्षक गंभीरचा अडथळा? प्रीमियम स्टोरी

धोनीला ‘मेंटॉर’ म्हणून नियुक्त करण्यास ‘बीसीसीआय’ उत्सुक असल्याची चर्चा असली, तरी अद्याप त्यांच्याकडून अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

rohit sharma virat kohli
निवृत्त भारतीय क्रिकेटपटूंना BCCI कडून किती पेन्शन मिळते?

BCCI Pension Scheme: बीसीसीआयकडून क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या खेळाडूंना किती मानधन दिले जाते? जाणून घ्या.

sahil parakh shine for India U19
साहिल पारख कोण ?…नाशिकपासून ऑस्ट्रेलियापर्यंत चर्चेत राहण्याचे कारण…

वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघाच्या कर्णधारपदी साहिलची निवड झाली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या