PM Narendra Modi Trinidad speech: हा एका वास्तूचा इतिहास नाही, तर एका स्वप्नवेड्या माणसाच्या निश्चयाचा प्रवास आहे. त्याने सायकलवर बांधकाम साहित्य वाहून, समुद्राच्या विरोधात २५ वर्षं झगडत अखेर हे मंदिर उभं केलं. हेच ते ‘टेम्पल इन द सी’ जे आजही भारतीय परंपरेचा आशेचा किरण ठरत समुद्रात तेजाने झळकत आहे.