कोकण विभागातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग(Sindhudurg). या जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पूर्वी दक्षिण रत्नागिरी असे होते, येथील सुप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन ते बदलून सिंधुदुर्ग असे ठेवण्यात आले.
१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोवा राज्याची सीमा या राज्याच्या सीमांना संलग्न आहेत. रामायण, महाभारतापासून ते यादव, चालुक्य साम्राज्यांपर्यंत सिंधुदुर्गच्या भूमीचा उल्लेख आढळतो. येथे कोंकणी, मालवणी अशा स्थानिक भाषांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या जिल्ह्यामध्ये जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट या तिन्ही प्रकारचे किल्ले आहेत. पर्यटन, मासेमारी यांच्याव्यतिरिक्त आंबा, काजू यांची निर्यात करणे हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.Read More
कुडाळ एमआयडीसी मधील वर्षानुवर्षे पडीक असलेल्या भूखंडांवर कोणताही उद्योग न उभारलेल्या भूखंडधारकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे थेट आदेश उद्योगमंत्री उदय…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीबाबत खासदार नारायण राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत युती झाली पाहिजे असे सुतोवाच…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्तिक एकादशी आणि त्रिपुरारी पौर्णिमा दरम्यान गावोगावी देवदेवतांच्या जत्रोत्सवाना सुरूवात झाली आहे. या जत्रौत्सवातून आर्थिक उलाढाल होते.
कणकवली नगरपंचायतीवरील भाजप व राणे कुटुंबाचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबतच्या प्रस्तावावर लवकरच अंतिम निर्णय होणार आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी महामार्गासाठी भुयारी मार्गाच्या नावाखाली होणारे उत्खनन फक्त आर्थिक फायद्यासाठी असून,खनिज संपत्तीचे लचके तोडण्यास आम्ही कदापि…
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल ४३३८ हेक्टर शेतीचे क्षेत्र या…
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या चार रेल्वेगाड्यांपैकी दोन रेल्वेगाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा…