scorecardresearch

सिंधुदुर्ग Photos

कोकण विभागातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग(Sindhudurg). या जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पूर्वी दक्षिण रत्‍नागिरी असे होते, येथील सुप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन ते बदलून सिंधुदुर्ग असे ठेवण्यात आले.

१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोवा राज्याची सीमा या राज्याच्या सीमांना संलग्न आहेत. रामायण, महाभारतापासून ते यादव, चालुक्य साम्राज्यांपर्यंत सिंधुदुर्गच्या भूमीचा उल्लेख आढळतो. येथे कोंकणी, मालवणी अशा स्थानिक भाषांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या जिल्ह्यामध्ये जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट या तिन्ही प्रकारचे किल्ले आहेत. पर्यटन, मासेमारी यांच्याव्यतिरिक्त आंबा, काजू यांची निर्यात करणे हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.Read More
Malvan Sindhudurg Tourist boat sinks
9 Photos
Photos: श्वासांसाठी धडपड, आरडाओरड अन् धावपळ…; तारकर्ली बोट दुर्घटनेनंतरचे धक्कादायक फोटो

जय गजानन नावाची २० पर्यटकांना घेऊन जाणारी बोट एमटीडीसी रिसॉर्ट येथे किनाऱ्यावर आणत असतानाती बुडून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

मराठी कथा ×