स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ही भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आहे. तिचा जन्म १८ जुलै १९९६ रोजी झाला. तिचे कुटूंब सांगलीमध्ये (Sangli) वास्तव्याला आहे. तिचा मोठा भाऊ देखील क्रिकेट खेळतो. त्याच्यामुळे स्मृतीला या खेळाविषयी आकर्षण वाटू लागले. अवघ्या ९ वर्षांची असताना पंधरा वर्षाखालील महाराष्ट्राच्या क्रिकेट संघामध्ये झाली. तिने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण केले. तिच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तिला बिग बॅश आणि वूमन हंड्रेड अशा स्पर्धांमध्ये खेळण्याचाही अनुभव आहे.
२०२० मध्ये महिला विश्वचषक बऱ्याच सामन्यांमध्ये तिने चांगली धावसंख्या केली होती. तेव्हा एका सामन्यादरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. नेटीझन्स तिला नॅशनल क्रश अशी उपमा देऊ लागले. सध्या सुरु असलेल्या महिला प्रीमियर लीगच्या (MPL) लिलावामध्ये तिच्यावरुन मुंबई आणि बेंगळुरु यांच्यात युद्ध रंगले होते. शेवटी आरसीबी ३ कोटी ४० लाख रुपयांची बोली लावत तिला संघामध्ये घेतले. या संघाचे कर्णधारपद तिच्याकडे जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.Read More
Smriti Mandhana Fastest Century: भारताच्या महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मन्धानाने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात एकदिवसीय सामन्यात ७७ चेंडूत शतक झळकवले…